काही तासांची ‘नवरी’... ३९ वर्षीय युवकाला लग्‍नाच्या आमिषाने छ. संभाजीनगरला बोलावून सिनेस्‍टाइल लुटले!; कोर्टात केलेली लग्‍नाची नोटरी अन्‌ २५ वर्षीय 'दुल्हन' घेऊन टोळी पसार!!, शहरात विवाहेच्‍छुकांना लुटणारे रॅकेट?

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भौतिक सुखाच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला आता शेती नकोशी झाली आहे. त्‍यामुळे शेतकरी मुलगा म्‍हटलं की मुली नाक मुरडतात. शहरात १० हजार रुपये कमावून सिंगल रूममध्ये राहणारा मुलगा चालेल, पण शेती असलेला बंगल्यावालाही सधन शेतकरी नको असतो... याचा गैरफायदा घेणारी टोळी छत्रपती संभाजीनगरात समोर आली आहे. ३९ वर्षीय शेतकरी युवकाला २५ वर्षीय तरुणीचा फोटो दाखवताच त्‍याने होकार भरला. त्‍याला लग्‍नाच्या आमिषाने शहरात बोलाविण्यात आले. कोर्टात लग्‍नाची नोटरीही केली. त्‍यानंतर त्‍या सुंदर ललनेसोबत लग्‍नानंतरची स्वप्ने रंगवत तो तिला घेऊन गावी परतण्यासाठी निघाला. पण वाळूजजवळच रस्‍त्‍यात सिनेस्‍टाइल त्‍यांची कार दुसरी गाडी आडवी लावून अडविण्यात आली. गाडीतून उतरत टोळीने तोडफोड सुरू केली. नव्या नवरीने लग्‍नाची नोटरी अन्‌ पैशांची बॅग घेतली अन्‌ साथीदारांसोबत पसार झाली...

२९ जुलैला घडलेल्या या धक्कादायक घटनेची तक्रार विवाहेच्‍छुक युवक महेश शहाजी यादव (वय ३९, रा. आर्वी ता. कोरेगाव जि. सातारा) याने सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी (५ ऑगस्ट) केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी एजंट नंदकुमार चव्हाण (रा. आर्वी), नवरीची मावशी मोनिका (रा. छत्रपती संभाजीनगर), दिशा माधव कदम (रा. आंबेडकरनगर, छ. संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो आई-वडिलांसह राहतो. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. २५ जुलैला एजंट नंदकुमार चव्हाण (वय ५५, रा. आर्वी) हा त्याच्या घरी आला.

त्याने महेशच्या लग्नासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मुलगी दिशा माधव कदम (वय २५, रा. आंबेडकरनगर छत्रपती संभाजीनगर) हिचे स्थळ सुचविले. त्याने मुलीचा फोटो दाखवला. महेशला मुलगी पसंत पडल्याने त्‍याने लगेच होकार दिला. त्‍याचवेळी महेशच्या कुटुंबीयांनी मोनिका हिच्याशी फोनवर लग्नाविषयी चर्चा करून १ लाख ८० हजार रुपये देण्याचे ठरवले. २९ जुलैला रात्री साडेअकराला साताऱ्याहून छत्रपती संभाजीनगरकडे येण्यासाठी निघाले. महेश, त्याचा चुलतभाऊ शैलेश मोहन यादव (वय २७), समाधान वसंत पिसाळ (वय ४०), बाळू एकनाथ यादव (वय ६५),  नंदकुमार चव्हाण (सर्व रा. आर्वी) असे सर्व खासगी वाहनाने काळा गणपती मंदिर सिडको येथे दुपारी साडेबाराला पोहोचले.

मोनिकाने त्‍यांना आंबेडकरनगर येथे दिशाच्या घरी संध्याकाळी साडेपाचला नेले. तेथे चहा पाणी झाल्यानंतर साड्या घेण्यासाठी राधिका साडी सेंटर टिळक पथ येथे सर्व जण गेले व साड्या घेतल्या. नंतर मोनिका त्‍यांना फॅमिली कोर्टात एका वकिलाकडे घेऊन गेली. वकिलाने नोटरी बनवून सह्या करून घेतल्या. महेशने वकिलाला गुगल पेवरून ५ हजार रुपये पाठवले. कोर्टासमोर गाडीत बसून मोनिकाला १ लाख रुपये एजंट नंदकुमार याच्यासमोर रोख दिले. नंतर मोनिकाला गुगल पेवर ७५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर महेश, त्‍याच्यासोबतचे नातेवाइक, दिशा माधव कदम व तिच्यासोबत तिची गुरु बहीण नाव पत्ता माहीत नाही असे सर्व जण गावी जाण्यासाठी निघाले. रात्री साडेआठला अहिल्यानगर रोडवर वाळूज येथे त्‍यांच्या ओमिनी गाडीजवळ (MH 11 CQ 4754) अचानक एक फोरव्हीलर गाडी उभी राहिली.

तिचा नंबर महेशने गडबडीत घेतला नाही. त्‍यांनी महेशच्या गाडीच्या समोरील काचा फोडून ड्रायव्हरला डोक्यात मारून जखमी केले. एजंट नंदू चव्हाण याचा मोबाईल व चावी तसेच महेशजवळील बॅग ज्यामध्ये लग्नाचे कागदपत्र व ३५ हजार रुपये होते, ती बॅग दिशाने घेतली आणि त्या लोकांसोबत निघून गेली. गाडीची काच फोडल्याबाबत महेशने वाळूज ठाण्यात २ ऑगस्टला तक्रार केली आहे. यावेळी महेशच्या लक्षात आले, की या सर्वांनी आपली फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष शेवाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी

Latest News

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी अशोक खेमका ३४ वर्षे नागरी सेवेत राहिले. या काळात त्यांच्या एकूण ५७...
‘देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा संत शक्ती मैदानात उतरते’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत २ मोठ्या घोषणा!
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
काही तासांची ‘नवरी’... ३९ वर्षीय युवकाला लग्‍नाच्या आमिषाने छ. संभाजीनगरला बोलावून सिनेस्‍टाइल लुटले!; कोर्टात केलेली लग्‍नाची नोटरी अन्‌ २५ वर्षीय 'दुल्हन' घेऊन टोळी पसार!!, शहरात विवाहेच्‍छुकांना लुटणारे रॅकेट?
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software