शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली, चावणाऱ्या कुत्र्यांपैकी एकाला नागरिकांनीच केले ठार, मोतीकारंजा येथील घटना, मारणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. मोकाट कुत्र्याने चावे घेतलेल्या रुग्णांची संख्या घाटी रुग्णालयातही वाढत आहे. मात्र मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका कमी पडत आहे. अशा स्थितीत आता नागरिकही मोकाट कुत्र्यांना ठार मारत असल्याचे समोर येत आहे. सोमवारी (४ ऑगस्ट) येणाऱ्या जाणाऱ्यांना चावणाऱ्या २-३ कुत्र्यांपैकी एका कुत्र्याला नागरिकांनी ठार केले. या प्रकरणात एका प्राणीमित्राने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी कुत्र्याला मारणाऱ्या लोकांविरुद्ध मंगळवारी (५ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय सरवयै राजपूत (वय ३०, रा.बसयैनगर ॲपेक्स हॉस्पिटलजवळ) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते भटक्या कुत्र्यासाठी काम करणाऱ्या आपला NGO या संस्थेत काम करतात. ही संस्था भटक्या कुत्र्यांसाठी खाऊ घालणे, जखमी असल्यास उपचार करणे अशी कामे करते. सोमवारी रात्री १० ला त्‍यांच्या मित्राने त्‍यांना कॉल करून सांगितले, की मोतीकारंजा येथील नोबल एंटरप्रायजेसजवळ एक कुत्रा मरण पावलेल्या अवस्थेत पडलेला आहे.

त्‍यामुळे अक्षय आणि आपला NGO संस्थेच्या श्रीमती बेरील साँचिस या रात्री साडेदहाला मोतीकारंजा येथे आले. तेथे काही लोक जमा झालेले होते. त्यांना विचारपूस केली असता त्‍यांनी सांगितले, की दोन- तीन कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चावत होते. त्यापैकी एका कुत्र्याला चार-पाच जणांनी मारले. ते कोण होते आम्हाला माहीत नाही. अक्षयच्या तक्रारीवरून अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस अंमलदार भाऊराव गायके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी

Latest News

तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी अशोक खेमका ३४ वर्षे नागरी सेवेत राहिले. या काळात त्यांच्या एकूण ५७...
‘देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात, तेव्हा संत शक्ती मैदानात उतरते’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत २ मोठ्या घोषणा!
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
काही तासांची ‘नवरी’... ३९ वर्षीय युवकाला लग्‍नाच्या आमिषाने छ. संभाजीनगरला बोलावून सिनेस्‍टाइल लुटले!; कोर्टात केलेली लग्‍नाची नोटरी अन्‌ २५ वर्षीय 'दुल्हन' घेऊन टोळी पसार!!, शहरात विवाहेच्‍छुकांना लुटणारे रॅकेट?
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software