वैजापूरच्या अंचलगावचा लाचखोर तलाठी गोविंद सबनवाड २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला!, छ. संभाजीनगरच्या पडेगावमध्ये राहतो

On

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्‍यातील अंचलगावचा लाचखोर तलाठी गोविंद रामचंद्र सबनवाड (वय ५४, रा. ताराराम सोसायटी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लोणी खुर्द (ता. वैजापूर) येथील श्रीकृष्ण मल्टीसर्व्हिसेस या झेरॉक्स दुकानात बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी २ वाजता करण्यात आली.

तक्रारदार शेतकऱ्याची वैजापूर तालुक्यातील बाभूळतेल येथील गट क्र. २४२ मध्ये वडिलोपार्जित ५२ आर. शेती असून, शेतीच्या फेरनोंदणीसाठी १८ सप्टेंबर २०२३ रोजी आईच्या नावे कागदपत्रांची फाईल शेतकऱ्याने तलाठी सबनवाडकडे दिली होती. मात्र फेरनोंदणीसाठी नोटीस काढून सातबाऱ्यावर नाव लावून देण्यासाठी सबनवाडने दोन हजार रुपयांची मागणी केली. एसीबीने लाचेच्या मागणीची पडतपाळणी करून सापळा रचला. दोन हजार रुपये स्वीकारताना सबनवाडला एसीबीने रंगेहात पकडले.

त्‍याच्याकडील रेडमी मोबाइल, ६३९० रुपये रोख रक्कम आणि २,००० रुपयांची लाच जप्त करण्यात आली. त्‍याच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. त्‍याच्या राहत्या घरीदेखील झडती सुरू आहे. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास केला जात आहे. पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे, पोलीस अंमलदार भीमराज जीवडे, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे समस्‍येकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय... 

Latest News

महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे समस्‍येकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय...  महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे समस्‍येकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय... 
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील पार्किंगची समस्या आता सुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट...
ठाकरे गटाच्या महिला सरपंच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव?, मावसाळाच्या राजेश्री देवगिरीकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ
कर्मचारी महिलांना घरी बोलावून मालिश करून घेतली; ‘सामाजिक कल्याण’च्या  तत्‍कालिन उपायुक्‍तांविरुद्ध गुन्हा दाखल
आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...
वैजापूरच्या अंचलगावचा लाचखोर तलाठी गोविंद सबनवाड २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला!, छ. संभाजीनगरच्या पडेगावमध्ये राहतो
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software