हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य सहकारी पाणन महासंघ, मुंबई तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी व खरेदी प्रक्रिया १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे.

या योजनेअंतर्गत हरभऱ्याचा हमीभाव ५,८७५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष खरेदी १ मार्च ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी NCCF कार्यालयाने ९ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तालुक्यांचा समावेश आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन नोंदणी करून हमीभावाने खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त

Latest News

धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाविद्यालयीन तरुण गांजा तस्करीत लिप्त असल्याचे धक्कादायक वास्तव मंगळवारी (१० मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास...
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Good News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या, १२ मार्चला छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software