आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : ट्रकला रॅम्पजवळ उभे करताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडून आरटीओ एजंटचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना करोडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी (१० मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सोमनाथ आत्माराम काकडे (वय ३०, रा. शेंद्रा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

ही घटना आरटीओतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ट्रक (क्र. एमएच १८ बीए ८०१७) चालक मच्छिंद्र धनाड (रा. पालखेड, ता. वैजापूर) व मालक दादासाहेब ठोंबरे (रा. वैजापूर) यांनी पासिंगसाठी आरटीओ कार्यालयात आणला होता. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पासिंगसाठी क्रमांक लावण्यासाठी ट्रक आरटीओ सेंटरमध्ये रॅम्पजवळ नेण्यात येत होता. पण, चालकाने ट्रक पुढे घेताना आजूबाजूला कोणी आहे का, याची खात्री न करता निष्काळजीपणे ट्रक पुढे घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यावेळी बाजूला उभे असलेले सोमनाथ डाव्या चाकाखाली आले. सोमनाथ कष्टाळू होते. वाहनधारकांना कागदपत्रांच्या कामात मदत करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ तसेच आई-वडील असा परिवार आहे.

WhatsApp Image 2026-03-10 at 9.09.18 PM (1)
ट्रकचालक मच्छिंद्र धनाड

अपघातानंतर आरटीओ कार्यालय तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या खासगी संस्थेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दुपारी चारपर्यंत आरटीओ कार्यालयातील कोणीही या घटनेविषयी माहिती देण्यास तयार नव्हते. संबंधित खासगी कंत्राटदार व्यवस्थापकाने लपवालपवी करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी मिळाल्याशिवाय कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतरही त्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या अपघाताची दखल घेण्यात आली आहे. अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसून तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. दरम्यान, वाहनधारकांना नियमांचे धडे देणाऱ्या आरटीओ कार्यालयातच असा निष्काळजीपणा झाल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software