धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाविद्यालयीन तरुण गांजा तस्करीत लिप्त असल्याचे धक्कादायक वास्तव मंगळवारी (१० मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास शहर पोलिसांच्या समोर आले. मोटारसायकलीवरून जाणाऱ्या २ विद्यार्थ्यांकडे तब्बल २८ लाख रुपयांचा हायब्रीड गांजा मिळून आला. त्याची विक्री ते १० हजार रुपये प्रती ग्रॅमने करणार होते. या विद्यार्थ्यांचे एक मोठे रॅकेटच गांजा विक्रीत गुंतलेले असल्याच्या चौकशीतून समोर आले. क्रांती चौक पोलिसांनी ८ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. दोघांना ताब्यात घेतले असून, बाकीच्यांचा कसून शोध सुरू आहे. या कारवाईने शहरभर खळबळ उडाली आहे. विशेष म्‍हणजे, हे विद्यार्थी स्नॅपचॅटद्वारे गांजा विक्रीचे रॅकेट चालवत होते.

ओम रवींद्र शिंदे (वय २३, रा. एन ४, शहीद भगतसिंग कॉलनी), राजविर चरणसिंग बिरग (वय २०, रा. ए सेक्टर, एन ४, हनुमान मंदिराजवळ) अशी पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार साथीदर निशू वर्मा (रा. एन ४ सिडको), ओम जाधव (रा. रेणुका माता कमान सातारा परिसर), चैतन्य (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कांचनावाडी), ओम कासलीवाल (रा. ए.पी.आय. कॉर्नर), दर्शन मदगे (रा. मुकुंदवाडी), मित राजपूत (रा. एन ४, सिडको) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत चिखलीकर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, बाबा पेट्रोलपंप परिसरात दोघे प्लॅटीना मोटारसायकलीवर गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहेत. त्यांनी ही बातमी पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना कळवली. त्यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण वाघ, अभिजीत चिखलीकर, जगन्नाथ मेनकुदळे, पोलीस अंमलदार जाधव, पाटील, गावंडे, विनोद परदेशी, विजय निकम, दीपक शिंदे, वाडीलाल जाधव, अमोल मुगळे, डाखुरे, पांढरे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे यांच्या पथकाने छाप्याचे नियोजन केले. सकाळी सव्वादहाच्या सुमारास ते बाबा पेट्रोलपंप परिसरात आले.

साडेदहाच्या सुमारास संशयित दोन जण प्लॅटीना मोटारसायकलीने नगर नाक्याकडून येणाऱ्या लोखंडी पुलाजवळ आले. पोलिसांनी लगेचच घेरून त्यांना पकडले. ओम शिंदे आणि व मागे बसलेल्याचे नाव राजविर बिरग असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील बॅग व मोटारसायकलची झडती घेतली. राजविरकडील बॅगेतील प्लास्टिक पिशवीत गांजा (कॅनबीस वनस्पती), डिजीटल वजन काटा मिळून आला. अंगझडतीत दोन मोबाइल मिळून आले. गांजाचे एकूण वजन २८५ ग्रॅम भरले. या गांजाची किंमत २८ लाख ५० हजार रुपये आहे.

५०० रुपयांचा डिजीटल वजन काटा, २०० रुपयांची बॅग, ४० हजार रुपयांचे २ मोबाइल व ६० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण २९ लाख ५१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गांजा कोणाकडून खरेदी केला व कोणाला विक्री करणार होते, अशी विचारणा केली असता राजविरने सांगितले, की आम्ही पैसे जमा करून विक्री करण्याच्या उद्देशाने जॉली (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पनवेल) याच्याशी स्नॅपचॅटवरून संपर्क करून गांजा मागवला होता. गांजा हायब्रीड असल्याने त्याची जास्त मागणी असल्याने तो सहजासहजी कोठेही मिळत नाही. त्यामुळे आम्ही गांजा हा प्रति ग्रॅम १० हजार रुपये प्रमाणे विकतो, असे राजविरने सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software