महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या विकृताविरुद्ध गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (१० मार्च) गुन्हा दाखल केला आहे. कीर्तनकार ज्ञानेश्वर चौधरी यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.

इलियास शेख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याबद्दल पोलीस माहिती काढत असून, लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. तक्रारीनुसार, ज्ञानेश्वर चौधरी हे रामगिरी महाराजांचे शिष्य आहेत. लव्ह जिहादबद्दल रामगिरी महाराजांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अशा आरोपींना कडक शिक्षा व्हावी, असे मत व्यक्त केले होते. त्यांचा व्हिडीओ एका युट्यूब चॅनलने त्यांच्या फेसबुक पेजवर टाकला असता त्यावर कमेंट करताना इलियास शेख यांनी पातळी सोडली आणि आक्षेपार्ह, अश्लील भाषेत टिप्पणी केली. त्यामुळे रामगिरी महाराजांच्या भक्त परिवाराच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software