छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ५ महिन्यांच्या गर्भवतीचा घरीच अनधिकृत गर्भपात करण्याचा प्रयत्न तिघांनी तिच्या पती व सासरच्या सांगण्यावरून केला. वेळीच ही बाब पोलिसांना कळल्याने त्यांनी विवाहितेच्या घरी छापा मारला. विवाहितेची प्रकृती बिघडलेली असल्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल करावे लागले. हा धक्कादायक प्रकार नारेगावमधील बलूच गल्लीत शुक्रवारी (६ मार्च) सायंकाळी घडला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात मंगळवारी (१० मार्च) विवाहितेच्या पती, सासू-सासऱ्यासह गर्भपात करणारे दोन पुरुष व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रिजवाना बेगम अरबाज सय्यद (वय २६, रा. बलूच गल्ली, अरबाज वॉशिंग सेंटरमागे, नारेगाव, ह. मु. कौसर पार्क, कौसर मशिदीजवळ, नारेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे, की पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद, सासरे फेरोज मन्सूर सय्यद, दोन चिमुकल्या मुलींसह राहतात. त्यांच्या पतीचे वॉशिंग सेंटर आहे. मोठी मुलगी जन्माला आली तेव्हा सासऱ्यांनी रिजवाना यांना माहेरी आणून सोडले होते. त्यानंतर रिजवाना यांचे आई- वडील व नातेवाइकांनी सासऱ्यांना समजावून सांगितल्याने ते ४ महिन्यांनंतर रिजवाना यांना सासरी घेऊन गेले होते.

त्यानंतर त्या दुसऱ्यांदा गरोदर राहिल्या आणि दुसऱ्यांदाही मुलगीच झाली. त्यामुळे पती त्यांना खासगी हॉस्पिटलमध्येच सोडून निघून गेला होते. त्यानंतर तिसऱ्यांदा त्या पाच महिन्यांच्या गरोदर राहिल्या. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचे पती अरबाज हे दोन पुरुष व एका अनोळखी महिलेला घरी घेऊन आले. त्यांच्याकडे एक मशीन होती. त्यावेळी अरबाज यांनी रिजवाना यांना सांगितले की, हे डॉक्टर असून ते तुला चेक करून मुलगा आहे की मुलगी सांगतील. त्यानंतर पती, सासू, सासऱ्याने जबरदस्तीने चेक करायला लावले. तपासणाऱ्या लोकांनी मशीनने चेक करून मुलीचा गर्भ असल्याचे सांगितले.

ते लोक निघून गेल्यानंतर पती, सासू व सासरे म्हणाले, की तिसऱ्यांदा देखील तुला मुलगी आहे. तुझा गर्भपात करू. त्यावर रिजवाना यांनी विरोध केला. त्यावेळी पतीने त्यांना हाताचापटाने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत लावण्यात आला आहे. शुक्रवारी (६ मार्च) दुपारी ३ च्या सुमारास पतीने दोन अनोळखी पुरुष व एक महिलेला पुन्हा घरी आणले. त्यातील महिलेने तिचे नाव कमळ गोकुळ तीनगोटे सांगून ती जालन्याला राहते, असे सांगितले होते. त्यांच्याकडे एक बॅग होती. त्या लोकांनी रिजवाना यांच्या पतीकडे गोळ्या दिल्या आणि त्या रिजवाना यांना जबरदस्तीने खाऊ घातल्या. काही वेळाने रिजवाना यांना ओटीपोटात दुखायला लागले होते. त्यावेळी त्या लोकांनी गर्भपात करण्यासाठी लागणारे साहित्य बाहेर काढले आणि रिजवाना यांना जबरदस्तीने गाऊन घालण्यास सांगितले. त्यावेळी खूप वेदना होत असल्याने रिजवाना ओरडत होत्या. त्यानंतर तब्येत खूप खराब झाल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडील रशीद दाऊद शेख यांना त्यांच्या मोबाइलवर फोन करून रिजवाना यांनी सांगितले की, माझी तब्येत खूप खराब झाली आहे.

त्यानंतर रिजवाना यांचे पोट जास्त दुखत असल्याने त्या लोकांनी खाली झोपवून पोट दाबायला सुरुवात केली. रात्री ८ ते साडेआठच्या सुमारास रिजवाना यांचे वडील, काका हे पोलिसांना घेऊन रिजवाना यांच्याकडे आले. गर्भपात करण्यासाठी आलेले दोन लोक व एक महिला पोलिसांना पाहून घराच्या मागच्या दरवाजातून पळून गेले. त्यानंतर रिजवाना यांचे वडील व काकांनी रिजवाना यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. पती, सासू, सासरे व अनोळखी दोन व्यक्ती व एक महिला यांनी जबरदस्तीने दिलेल्या गर्भपात होण्याच्या गोळ्यामुळे रिजवाना यांच्या पाच महिन्यांच्या मुलीचा गर्भपात केला. घाटीतील डॉक्टरांनी उपचार करून ८ मार्चला रिजवाना रुग्णालयात सुटी दिली. त्यानंतर रिजवाना यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास लहाने करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software