महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील रोंगला गावात ५८ वर्षीय बलजित कौर या महिलेची वैयक्तीक कारणातून हत्या करून पळालेल्या ३ मारेकऱ्यांपैकी मुख्य संशयित गुरविंदरसिंग ऊर्फ गोल्डी नछत्तरसिंग (वय ३४) याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर शहर गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पोलिसांनी रविवारी (८ मार्च) अटक केली. ९ मार्चला त्याला पंजाब पोलीस येऊन घेऊन गेले.

बलजित कौर १९ फेब्रुवारीला शेतात जात होत्या. रस्त्यात सरपंच पुत्रासह तिघांनी त्यांना अडवले आणि निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे पटियाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनरोष निर्माण झाला होता. बलजित यांच्या नातेवाइकांनी मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. पंजाब पोलिसांवर मोठा दबाव वाढला होता. मुख्य मारेकरी गुरविंदर सिंग सचखंड एक्स्प्रेसने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याचे कळताच पंजाब पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना संपर्क केला.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर, पोलीस अंमलदार संजय गावंडे, विनोद परदेशी, राजाराम डाखुरे, सागर पांढरे, अमोल मुगळे, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला. रेल्वे येताच गुरविंदरसिंग पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून अटक केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software