जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची विशेष सभा बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे, असे पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम असा : १८ मार्चला सकाळी १० ते १२ नामनिर्देशन स्वीकारणे, दुपारी २ वा. विशेष सभेस सुरुवात, प्रथम प्राप्त नामनिर्देश पत्राची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (मराठी वर्णाक्षर क्रमानुसार) तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रथम अध्यक्षपदासाठी व नंतर उपाध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर हात वर करून मतदान घेण्यात येईल. हात वर करून मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती यांना विशेष सभेस हजर राहण्यास कळविण्यात आले आहे. तथापि, सभापतींना मतदान करता येणार नाही, असे पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software