तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना सिल्लोड तालुक्यातील नानेगाव-जंजाळा रस्त्यावरील गट क्र. १५४ मध्ये नानेगाव शिवारात सोमवारी (९ मार्च) सकाळी १० च्या सुमारास घडली. ९ तासांनी सायंकाळी सातला तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले.

उमर अन्वर बेमरोट (वय १०), साद अन्वर बेमरोट (वय ७) हे सख्खे भाऊ आणि सरफराज सलीम देहेंगल (वय ९, तिघे रा. नानेगाव, ता. सिल्लोड) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत सरफराज तिसरीत, उमर चौथीत तर साद हा पांगरी येथील खासगी इंग्रजी शाळेत पहिलीत शिकत होता. नाथषष्ठीमुळे सोमवारी शाळेला सुटी असल्याने तिघे तलावात अंघोळीसाठी गेले होते.

न कळत ते पाण्याच्या खोल भागाकडे  गेले आणि बुडाले. बराच वेळ होऊनही मुले न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. दुपारी २ च्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तलावावर मोटारपंप चालू करण्यासाठी गेला असता तलावाच्या काठावर मुलांचे कपडे दिसून आले. त्याने तत्काळ गावात कळवले. त्यानंतर ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. मुलांचा शोध सुरू केला. सोमवारी सायंकाळी सातला तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. रात्री ११ ला तिघांचा दफनविधी करण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...

Latest News

रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले... रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
https://www.instagram.com/reel/DVqQgyaDV0t/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा रिलस्टार अरुण तुपे (वय २५, रा. बालाजीनगर) मंगळवारी (१० मार्च) नेहमीप्रमाणे...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software