व्हिडीओ : बजाजनगरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : बजाजनगरातील कामगार चौकात ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर सोमवारी (९ मार्च) मध्यरात्री १२ च्या सुमारास अनोळखी हल्लेखोरांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बजाजनगरातील आपले जय भवानी हॉटेल बंद करून कृष्णा राठोड हे सहकारी मन्नू राठोड यांच्यासोबत घरी जात होते. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी काही कळण्याच्या आतच चाकू काढून कृष्णा यांच्यावर सपासप वार केले. राठोड गंभीर जखमी झाले. मन्नू राठोड यांच्यावरही चाकूने वार करून जखमी करण्यात आले. हल्ल्यामागचे कारणही समोर आले असून, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले. हल्लेखोर जय भवानी हॉटेलच्या शेजारील हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. हॉटेल बंद झाल्यानंतर तिघेजण राठोड यांच्या हॉटेलसमोर येऊन हॉर्न वाजवत होते. राठोड यांनी बाहेर येऊन त्यांना याबाबत टोकले. त्यातून बाचाबाची झाली. यातून तिघांनी हल्ला केल्याचे समोर आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software