संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संघ लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा - II रविवार, १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा सत्र –I सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत व सत्र – II दुपारी 14 ते 16.30 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच सीडीएस – II परीक्षा -2024 परीक्षा – I सकाळी 9 ते 11, सत्र – II 12.30 ते 2.30 व सत्र –III दुपारी 4 ते 6 या कालावधीत परीक्षेचे आयोजन केले आहे. एकूण 16 परीक्षा उपकेंद्रांवर परीक्षा होणार असून परीक्षेसाठी एकूण 4 हजार 702 उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आलेला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थींची संख्या याप्रमाणे :
1. शासकीय विद्यालय कला व विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ (288)
2. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (सायसन्स बिल्डिंग भाग- अ) रोजा बाग, हर्सूल रोड, (277)
3. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट - ब) रोजा बाग, हर्सूल रोड, (204)
4. सरस्वती भुवन मुलांची शाळा, औरंगपुरा (384)
5. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, औरंगपुरा (192)
6. विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय, समर्थ नगर (288)
7. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थ नगर (288)
8. न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हर्सुल पिसादेवी रोड (288)
9. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, विभाग - अ औरंगपुरा (384)
10. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, विभाग - ब औरंगपुरा (384)
11. मिलिंद महाविद्यालय नागसेनवन (288)
12. डॉ. सौ.इंदुबाई पाठक महिला कला महाविद्यालय, समर्थ नगर (288)
13. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (288)
14.शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (288)
15. शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, उस्मानपुरा (181)
16. देवगिरी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय इमारत, उस्मानपुरा (392)

परीक्षार्थींसाठी सूचना
1. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
2. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र. ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
3. उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल.
4. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.
5. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यांनतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करून घेण्यात यावे.
6. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
7. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

Latest News

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...
खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software