- Marathi News
- सिटी क्राईम
- संशयित अरुण गव्हाडच्या पाठिशी उद्धव ठाकरे गट राहणार ठाम!; शहरभर संताप तरी डोक्यावर राहणार हात, ठाकर...
संशयित अरुण गव्हाडच्या पाठिशी उद्धव ठाकरे गट राहणार ठाम!; शहरभर संताप तरी डोक्यावर राहणार हात, ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेमुळे तीव्र असंतोष

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ६ मधील संभाजी कॉलनीत प्रमोद रमेश पाडसवान (वय ३८) यांच्या हत्येप्रकरणात ४ साक्षीदारांचे बुधवारी (२७ ऑगस्ट) सिडको पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आले. हत्येवेळी २७ लोक त्याठिकाणी हजर होते. पोलिसांनी त्यांचीही चौकशी सुरू केली असून, ४ साक्षीदार त्यातलेच आहेत. आतापर्यंत आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून, यात निमोणे कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. निमोनेची बहीण जयश्री मनोज दानवे अजूनही फरारी असून पोलिसांना तिचा थांगपत्ता अजून लागला नाही.
ज्ञानेश्वरने मुंबईहून दोन सेकंड हँड वाहने विकत आणली होती. त्यावर राजकीय पक्षाचे चिन्ह लावून शहरभर माज दाखवत होता. वाहने लावायला जागा नसल्याने दादागिरी करून पाडसवान कुटुंबाच्या घरासमोर उभ्या करायचा. हत्येनंतर दोन दिवस रुग्णालयाच्या आवारातच ही वाहने बेवारस उभी होती. गणपती स्थापनेशिवाय वाहन लावण्यावरूनही आमच्यात वाद होत होते, अशी कबुली ज्ञानेश्वरने पोलिसांना दिली.
कुणी त्रास देत असेल तर तक्रार करा : पोलीस आयुक्त
पाडसवान हत्येनंतर शहर पोलिसांबद्दल संताप निर्माण झाला. पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार करूनही कारवाई न झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की आजूबाजूच्या परिसरातील अथवा कोणत्याही व्यक्तीचा काहीही त्रास असेल तर त्यांनी थेट डायल ११२ या पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. जमिनीच्या वादासाठी अथवा इतर कारणांनी त्रास देणाऱ्या व्हाइट कॉलर गुंडागर्दीची तक्रार नागरिकांनी निर्भयपणे ११२ वर करावी. ठाण्यात अर्ज करावा तरीही आपले समाधान न झाल्यास वरिष्ठ अधिकारी वर्गाची भेट घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले आहे.