- Marathi News
- पॉलिटिक्स
- पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात मोठे सूतोवाच केले आहे. १५ डिसेंबरच्या आसपास निवडणुका होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
सर्व राजकीय पक्षांचे नेते गणेशोत्सवानिमित्त एकत्र आल्याचे पहायला मिळाले. १०१ वर्षांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या चरणी ते नतमस्तक झाले. संस्थान गणपती मंदिरात प्रतिकृतीची स्थापना करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते आरती करण्यात आली. पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे, खा. कल्याण काळे, खा. डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिल मकरिये, किशोर तुलसीबागवाले, प्रफुल्ल मालाणी, यंदाच्या गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांची उपस्थिती होती. संस्थान गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येत असून, यासाठी जागा संपादन अखेरच्या टप्प्यात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याची माहिती माजी महापौर नंदकुमार घोडेले व विश्वस्त प्रफुल्ल मालाणी यांनी दिली. या वेळी खासदार, आमदारांनी निधी देण्याची घोषणा केली. मंत्री शिरसाट म्हणाले, की मंदिराचा जीर्णोद्धार करताना अधिकृत जागेवरच बांधकाम करा, मंदिर उभारणीत पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असे ते म्हणाले.
छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या श्रींची प्रतिष्ठापना माजी महापौर अशोक सायन्ना यांच्या हस्ते झाली. या वेळी कार्याध्यक्ष रखमाजी जाधव, उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल दाभाडे यांनी सांगितले. केशर मॉलसमोरील महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित आरती वेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे, संजय गारोल, राहुल यलदी, विजय चौधरी, सनी वाघमारे, ॲड. दीपक ससाणे, युवराज डोंगरे, विनोद साबळे, ॲड. रोहित सोळसे, राहुल तुपे, अभिजित गंगावणे, महादेव जाधव, आशिष इंगळे, विशाल काकडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला, सुखदेव अंभोरे आदींची उपस्थिती होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
By City News Desk
पैठणमध्ये मनोज जरांगेंविरोधात पोस्ट टाकणाऱ्याला काळे फासले, कपडे फाडले !
By City News Desk
Latest News
28 Aug 2025 07:40:41
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ६ मधील संभाजी कॉलनीत प्रमोद रमेश पाडसवान (वय ३८) यांच्या हत्येप्रकरणात ४ साक्षीदारांचे...