विश्लेषण : फुलंब्रीच्या घटनेनंतर मुला-मुलींच्या वाढत्या मोबाइल वापराची पालकांना चिंता वाढली!; डॉक्टरांनी पालकांना दिला मोलाचा सल्ला!!

On

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी :  मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील निधोना येथे सतत मोबाइल पाहण्याबद्दल आई रागावली म्हणून १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्तीसगड राज्यात एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. कारण त्याच्या वडिलांनी त्याला मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये देण्यास नकार दिला होता. संतप्त मुलाने वडिलांना काठीने मरेपर्यंत मारहाण केली. अलीकडेच आग्रा शहरातून एक प्रकरण समोर आले होते, जिथे एका वडिलांनी आपल्या मुलीला आणि पत्नीला मोबाइलचा अतिवापर करण्यापासून रोखले. त्यानंतर मुलगी आणि आईने मिळून त्याला मारहाण केली. यात त्याचा हात तुटला...

निष्पाप मुलांमध्ये मोबाईल फोनचे व्यसन स्पष्टपणे दिसून येत असताना अशा घटना सतत समोर येत आहेत. त्यामुळे मुलांना या सवयीपासून मुक्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे खूप महत्वाचे आहे. डॉ. निमिषा अरोरा यांनी सांगितले, की त्रास देणाऱ्या चिमुकल्यांना शांत करण्यासाठी मोबाइल फोन देणे सोपा पर्याय वाटू शकतो. मात्र त्यांच्या विकसनशील मेंदूवर त्याचा परिणाम खूप धोकादायक असू शकतो. स्क्रीन टाइममुळे मुलांच्या मेंदूत डोपामाइन हार्मोनचा प्रवाह वाढतो. हा रिवॉर्ड हार्मोन त्यांना मोबाइलचे व्यसन लावतो. हळूहळू मुले वास्तविक जगापासून दूर, आभासी जगात राहू लागतात. हेच कारण आहे की आजकाल व्हर्च्युअल ऑटिझमची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

झोपेवर परिणाम होतो...
डॉक्टरांनी पुढे सांगितले, की चमकणारे दिवे, वेगवान अॅनिमेशन आणि मोठा आवाज मुलांच्या लहान मेंदूवर संवेदी ओव्हरलोड देतात. ज्यामुळे लक्ष कमी होते आणि झोप कमी होते. मुलांच्या मेंदूच्या वाढीचे मुख्य घटक म्हणजे बाहेरचे खेळ, हालचाल, मानवी संवाद आणि समस्या सोडवणे. मुलांना स्क्रीनवरून काहीही मिळत नाही. ना कोणतीही सर्जनशीलता किंवा कोणताही विचार. म्हणूनच पालकांनी त्यांना वेळ देऊन स्क्रीनपासून दूर करणे गरजेचे आहे.

स्क्रीन टाइम शून्य असावा
डॉक्टर सांगतात, की दोन वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाइम शून्य असावा. दुसरीकडे, जर दोन ते पाच वर्षांच्या मुलांना स्क्रीन टाइम दिला जात असेल तर तो फक्त एक तास असावा. जेवताना आणि झोपताना फोन अजिबात देऊ नका. मुलाला जेवताना किंवा झोपताना फोन दिला तर तो रोबोटसारखा जेवेल आणि त्याला जाणवणार नाही. झोपताना फोन दिल्याने त्याची झोपही बिघडेल. म्हणून ही सवय अजिबात लावू नका.

स्क्रीन टाइम अशा प्रकारे मर्यादित करा
मुलांमध्ये स्क्रीन टाइम मर्यादित करण्यासाठी, मुलांना एक तासापेक्षा जास्त स्क्रीन टाइम देऊ नये. याशिवाय, मुलाला रिकामा फोन घेऊन एकटे बसू देऊ नका. स्क्रीन टाइम नेहमीच पालकांच्या देखरेखीखाली असावा, जेणेकरून मूल थोडे संवादी होऊ शकेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Latest News

खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जरजरी बक्ष उर्स महोत्सवाच्या पावित्र्यास व येणाऱ्या भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे,...
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
गुड न्‍यूज : गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स, वाहनांनी आता घाटीत रुग्णांची नेआण!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software