गुड न्‍यूज : गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स, वाहनांनी आता घाटीत रुग्णांची नेआण!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयात आता रुग्णांची नेआण करण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स व बॅटरी ऑपरेटेड सहा सीटर वाहने उपलब्ध असतील. मंगळवारपासून (२६ ऑगस्ट) ही सेवा रुग्णांना मिळू लागली आहे.

घाटीला दोन बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स व दोन बॅटरी ऑपरेटेड सहा सीटर वाहन प्राप्त झाले असून, यातील दोन वाहने प्रत्‍यक्षात मंगळवारपासून सेवेत आणण्यात आली आहेत. अन्य वाहनेही लवकरच रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत सुरू राहतील, असे घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

अपघात विभागातून रुग्णांना गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सद्वारे मेडिसिन विभागात आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झटपट हलविण्यास मदत होत आहे. या सुविधेमुळे रुग्णसेवेत आमूलाग्र बदल होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. वाहने दोन्हीही शिफ्टमध्ये सतत सुरू राहतील. ही वाहने प्राप्त होण्यासाठी विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारत सोनवणे, विशेष कार्य अधिकारी डॉ.सुरेश हरबडे, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. सुचेता जोशी आदींचे प्रयत्न फळाला आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Latest News

खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जरजरी बक्ष उर्स महोत्सवाच्या पावित्र्यास व येणाऱ्या भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे,...
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
गुड न्‍यूज : गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स, वाहनांनी आता घाटीत रुग्णांची नेआण!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software