हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरात गणरायाच्या स्वागताच्या मिरवणुकीत हरवलेली १ वर्षाची चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तासभरात सुखरुप आईच्या कुशीत विसावली. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवली.

मोहटा देवी मंदिराजवळ मिरवणुकीमुळे शेकडो गणेशभक्तांची गर्दी झाली होती. याचदरम्यान मिरवणूक पहायला आलेल्या चिमुकलीचा हात आईच्या हातातून सुटला अन्‌ ती घाबरून गेली. तिला रडताना पाहून पोलिसांचे लक्ष वेधले गेले. साध्या वेशात गस्त घालत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने तिच्याकडे धाव घेत मायेचा आधार दिला. यानंतर लगेचच मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून ओळख पटविण्याचे व वाळूज एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या माध्यमातून ही माहिती मुलीच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचली. मुलीचा भाऊ राजेश डाकवा आणि त्यांचे घरमालक जमुना मंडल यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी पुरेशी शहनिशा केल्यानंतर चिमुकलीला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. हरवलेली मुलगी पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सुखरुप परत मिळाल्याने आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मारले. पोलीस ठाण्यात भावनिक वातावरण तयार झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

Latest News

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...
खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software