सीडीएममध्ये जमा केल्या पाचशेच्या १२ बनावट नोटा, गजानन महाराज मंदिर परिसरातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुंडलिकनगरच्या आयडीएफसी बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये (कॅश डिपॉझिट मशीन) एकाने साडेसहा हजारांच्या बनावट नोटा टाकून खऱ्या नोटा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला. बँकेकडून त्‍याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

बँकेचे उपशाखा अधिकारी स्वप्निल अजमेरा (वय ३५) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीनुसार, खातेदार सरफराज खान सलीम खान (बिस्मिल्ला कॉलनी) याने गजानन महाराज मंदिर परिसरातील बँकेच्या शाखेच्या सीडीएम मशीनमध्ये २४ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास ५०० रुपयांच्या एकूण १०६ नोटा टाकल्या होत्या. त्यापैकी १३ नोटा बनावट निष्पन्न झाल्या. सोमवारी (२५ ऑगस्ट) ही बाब समोर आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Latest News

खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जरजरी बक्ष उर्स महोत्सवाच्या पावित्र्यास व येणाऱ्या भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे,...
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
गुड न्‍यूज : गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स, वाहनांनी आता घाटीत रुग्णांची नेआण!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software