सिल्लोडमध्ये घरातच काळ ओढावला!; आजीचा पायऱ्यांवरून घसरून तर युवकाचा घरात शॉक लागून मृत्‍यू

On

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : वडोद चाथा (ता. सिल्लोड) येथील वृद्ध महिला घरातील पायरीवरून घसरून पडल्याने उपचारादरम्यान शनिवारी (२६ जुलै) सकाळी सातला त्‍यांचा मृत्यू झाला. २१ जुलैला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्‍या पडल्या होत्‍या. कडुबाई नामदेव साळवे (वय ७३) असे त्‍यांचे नाव आहे. कडुबाई यांना कुटुंबीयांनी तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते.

घरात काम करताना युवकाचा शॉक लागून मृत्‍यू
सिल्लोड शहरातील भराडी रस्त्यावरील निसर्गनगर येथे घरात काम करताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने अनिल प्रकाश दिवटे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२६ जुलै) सकाळी साडेसातला घडली. अनिल दिवटे यांना कुटुंबीयांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software