छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे १० किंवा त्यापेक्षा जास्त महिला कर्मचारी, तिथे अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावीच लागणार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापना व खासगी व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ नुसार ज्या आस्थापनेत १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील, त्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती (Internal Complaints Committee) स्थापणे बंधनकारक आहे.

अशी करा समिती स्थापन
समितीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. इतर सदस्यांमध्ये महिलांविषयक प्रश्नांवर कार्याचा अनुभव असलेले किंवा कायद्याचे ज्ञान असलेले सदस्य नेमावेत. समितीतील एकूण सदस्यांपैकी किमान ५० टक्के सदस्य महिला असणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर अधिनियमानुसार चौकशी करण्याची जबाबदारी समितीची राहील.

५० हजार रुपये दंड
जिल्ह्यातील १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांनी तात्काळ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून तिची माहिती महिला व बालविकास मंत्रालयाच्या SHE Box पोर्टलवर अपलोड करावी. समिती स्थापन न केल्यास अधिनियमाच्या कलम २६ नुसार संबंधित आस्थापना मालकास ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. हा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित आस्थापनेचा परवाना/नोंदणी रद्द करून दुप्पट दंड आकारण्याचीही तरतूद आहे. याबाबत सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी.

SHE Box पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक
SHE Box पोर्टलवर माहिती भरल्यानंतर त्याची प्रत कामगार उपआयुक्त कार्यालय, मालजीपुरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवावी किंवा कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवावी: dylabourabad@gmail.com असे आवाहन कामगार उपआयुक्त यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महिलेचे नाव, फोटो वापरून ‘इन्स्टा’वर बनावट खाते, महिलांना रिक्वेस्ट पाठवून अश्लील संभाषण करायचा..., वैजापूरच्या भऊरमधून युवकाला अटक

Latest News

महिलेचे नाव, फोटो वापरून ‘इन्स्टा’वर बनावट खाते, महिलांना रिक्वेस्ट पाठवून अश्लील संभाषण करायचा..., वैजापूरच्या भऊरमधून युवकाला अटक महिलेचे नाव, फोटो वापरून ‘इन्स्टा’वर बनावट खाते, महिलांना रिक्वेस्ट पाठवून अश्लील संभाषण करायचा..., वैजापूरच्या भऊरमधून युवकाला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इन्स्टाग्रामवर एका महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून, त्यावर तिचा फोटो लावून इतर महिलांना...
टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!
ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software