एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एसटी बसने प्रवास करत असाल तर तुम्हाला सतर्क करणारी ही बातमी आहे. चोर महिलांच्या टोळ्या प्रवास करण्याच्या बहाण्याने एसटी बसमध्ये शिरतात आणि प्रवाशी महिलांचे दागिने चालाखीने चोरून पसार होत आहेत. त्यामुळे दागिने घेऊन एसटी बसने प्रवासी करत असाल तर खूप काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत ३ ते ४ घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या चोर महिलांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

सुरेखा किर्तीकुमार पाटील (वय ४०, रा. शास्त्रीनगर, हेडगेवार हॉस्पिटलमागे, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती, दोन मुलांसह राहतात. त्यांचे पती वाळूज येथील कंपनीत खासगी नोकरी करतात. ५ डिसेंबरला पुतण्याचे लग्न चोपडा (जि. जळगाव) येथे असल्याने त्या व त्यांची नणंद ज्योती पराग जाधव (रा. ज्योतीनगर, छत्रपती संभाजीनगर) लग्नाला गेल्या होत्या. शनिवारी (६ डिसेंबर) दुपारी १ ला दोघी जळगाव ते पुणे एसटी बसने परतत होत्या. दुपारी ४ ला फुलंब्रीजवळ दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक पांढरा टॉप व पांढरा स्कार्फ बांधलेली महिला ही सुरेखा यांच्या सीटलगत येऊन उभी राहिली. दुसरी महिला जिने काळी साडी, ब्लाऊज, स्कार्फ तोंडाला बांधलेला होता. ती मागे जाऊन बसली. सीटलगत उभ्या महिलेला सुरेखा यांनी थोडी जागा बसण्यास दिली. सावंगी बसथांबा आल्यानंतर बसमध्ये जागा रिकामी झाल्याने सुरेखा यांनी त्या महिलेला रिकाम्या सीटवर जाऊन बसण्यास सांगितले. मात्र तिने दुर्लक्ष करून त्यांच्याजवळच बसून राहिली. सायंकाळी सव्वापाचला बस मिलकॉर्नर येथे आली. त्यामुळे बसच्या लगेज रॅकमध्ये ठेवलेली बॅग सुरेखा यांनी काढली. तेव्हा दागिने असलेली पिस्ता रंगाची पर्स उजव्या खांद्यावर लटकवलेली होती. पुढे बस थांबल्यावर सुरेखा आणि त्यांची नणंद बसमधून उतरल्या. त्यांच्या पाठोपाठ त्या दोन अनोळखी महिलाही बसमधून उतरल्या. बसच्या बाजूने चालत जाऊन मागील बाजूने निघून गेल्या. सुरेखा आणि त्यांची नणंद रिक्षात बसल्या. त्यावेळी त्यांनी पर्समधून फोन काढण्यासाठी पर्स पाहिली असता पर्सची चैन उघडी दिसली. त्यामुळे सुरेखा यांनी पर्स तपासली असता पर्समध्ये एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. हे दागिने सन २००७ मध्ये खरेदी करण्यात आले होते. यात ५५ हजार रुपयांचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ७ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे कानातील झुमके, ३८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे कानातील वेल साडेतीन तोळ्याचे, ३० हजार रुपयांची सोन्याची अंगठी ५ ग्रॅमची असे एकूण १ लाख ३१ हजार २०० रुपयांचे दागिने मुद्देमाल त्या अनोळखी महिलांनी चोरून नेले. अधिक तपास पोलीस अंमलदार सतीश आहेरकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software