हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌ चोरांना मशीन सोडून पळून जावे लागले. मशीनमध्ये लाखो रुपयांची रोकड होती. हा अचंबित करणारा प्रकार रविवारी (३ ऑगस्ट) पहाटे तीनला शहानूरवाडीत घडला.

शहानूरवाडीतील एसबीआयच्या शाखेजवळच एटीएम सेंटरही आहे. थार वाहनातून ४ चोर आले. त्‍यांनी सेंटरमध्ये जाऊन त्‍यांनी बराच वेळ पाहणी केली. सर्वप्रथम सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. बेल्टने मशीन ओढण्याआधी स्क्रू ड्रायव्हरने एटीएम काढण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आले नाही. थारने एटीएम थेट उखडून काढण्याचा प्लॅन त्‍यांनी केला. थारला दोन्ही बाजूंनी बेल्ट बांधले. बेल्टचे दुसरे टोक एटीएम मशीनला बांधले. गाडी सुरू करून मशीन ओढले. पण बेल्ट तुटला अन्‌ मोठा आवाज झाला. त्‍यामुळे चोरटे बिथरले आणि त्‍यांनी गाडीतून पळ काढला. नागरिकांनी पोलिसांना कळवल्याने जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. शाखा व्यवस्थापक विशाल इंदूरकर यांच्या तक्रारीवरून चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मशीन नेण्यासाठी काही अंतरावर वाहनदेखील उभे केलेले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software