- News
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पहिल्यांदाच होणारा केंद्रीय लोककला महोत्सव!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पहिल्यांदाच होणारा केंद्रीय लोककला महोत्सव!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच होणारा केंद्रीय लोककला महोत्सव ११ व १२ जानेवारी रोजी होणार आहे. यात ११ कलाप्रकार घेण्यात येतील, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
लोककला महोत्सवात एकूण ११ कला प्रकार सादर होणार आहेत. यात पोवाडा, गोंधळ, भजन, भारुड, लावणी, लोकगीत, लोकनाट्य, वासुदेव, कवाली, जलसा व कविता असे ११ कलाप्रकार असणार आहेत. काव्यवाचन व वासुदेव हे कलाप्रकार वैयक्तिक गटात तर उर्वरित सांघिक कला प्रकार असणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन, समारोप व कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
केंद्रीय युवक महोत्सवात ४८७ पैकी २२६ महाविद्यालयांच्या संघांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. या सर्व महाविद्यालयांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या संदर्भात व्यवस्थापन परिषद व युवक महोत्सव सल्लागार समितीच्या शिफारशीवरून हा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 06:52:42
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...

