वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वडील वारल्यानंतर आईनेही दोन वर्षांत दुसरे लग्न करून घेतले. त्यामुळे १६ वर्षीय पुतण्याला सांभाळण्याची जबाबदारी काका-काकूंवर आली. आता त्याला कुणीतरी फूस लावून पळविल्याची घटना समोर आल्याने काका-काकू हादरून गेले असून, काकूने सिटी चौक पोलिसांत धाव घेऊन अपहरणाची तक्रार शनिवारी (२१ मार्च) दुपारी तीनला नोंदवली आहे.

३५ वर्षीय काकूने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्या व त्यांचे पती घरगुती मेस चालवतात. दोन मुली व पुतण्यासह हे दाम्पत्य सिटी चौक परिसरात राहते. सन २०२१ मध्ये त्यांच्या मोठ्या दिराचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पत्नीनेही दुसरे लग्न केल्याने त्यांच्या मुलाला २०२३ पासून हे दाम्पत्य सांभाळत आहे. तो समर्थनगरातील इंग्रजी शाळेत १० वीत शिकतो. १८ मार्चला पुतण्याचा दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर असल्याने त्याला नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहाला काकूने परीक्षा केंद्रावर सोडले.

त्याला घेण्यासाठी दुपारी दीडला गेल्या असता तो दिसून आला नाही. सर्व मुले जाईपर्यंत त्यांनी त्याची वाट पाहिली, मात्र तो दिसून आला नाही. तो गर्दीतून घरी गेला असावा, असे वाटल्याने त्या घरी आल्या असता, तो घरीही आलेला नव्हता. त्याच्या मित्रांना विचारणा केली, आजूबाजूला शोधले, नातेवाइकांकडेही शोधले, मात्र तो मिळून आला नाही. त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे काकूने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार असगर शेख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...
छत्रपती संभाजीनगरात २५ मार्चला रोजगार मेळावा, विविध कंपन्या भरणार २२८ रिक्त पदे
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना
वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software