विष पिऊन शेतकऱ्याची आत्‍महत्‍या, सिल्लोड तालुक्यातील सारोळ्याची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सारोळा (ता. सिल्लोड) येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने शेतात विष पिऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना रविवारी (२२ मार्च) दुपारी चारच्या सुमारास घडली.

सुदाम चंद्रभान काकडे (वय ५०, रा. सारोळा, ता. सिल्लोड) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की सुदाम काकडे रविवारी सकाळी नऊला शेतात गेले. तिथेच त्यांनी विष पिले. ही बाब लक्षात येताच त्यांचा मुलगा रोहित यांनी त्यांना उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू असताना काही तासांच्या अंतराने दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शेतकऱ्याच्या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...
छत्रपती संभाजीनगरात २५ मार्चला रोजगार मेळावा, विविध कंपन्या भरणार २२८ रिक्त पदे
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना
वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software