निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे खून प्रकरण : विशालची आलिशान कार जप्त, २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडून ६५ लाख रुपये घेतल्यानंतर विशाल विकास राठोड (वय २४, रा. गेवराई तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) याने १२ लाखांची आलिशान कार (क्र. एमएच १२ एनयू ०३३३) खरेदी केली. उर्वरित ५० लाखांहून अधिक रकमेचा वापर नेमका कशासाठी झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. विशाल आणि त्याचा साथीदार करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २५ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

पोलिसांनी विशालची कार कोकणवाडी येथील बॉम्बे ऑटो वर्क्स गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी लावली होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे. बाकीच्या आर्थिक व्यवहारांचा कसून तपास केला जात आहे. हत्येसाठी वापरलेले पिस्तूल विशालने सुरुवातीला उज्जैन येथून विकत घेतल्याचे सांगितले होते. पथक रवाना झाल्यानंतर त्याने जबाब बदलला, पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने पिस्तूल खाटूश्याम येथून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पथक खाटूश्यामला जाणार आहे. दरम्यान, विशाल राठोड आणि करण आडेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी दोघांची पोलीस कोठडी २५ मार्चपर्यंत वाढवली. या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

अशी केली होती हत्या
राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या हत्या प्रकरणात रीलस्टार विशाल विकास राठोड (वय २४), त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार (वय ३२, दोघे रा. रा. गेवराई तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि नातेवाइक करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आलेली आहे. लोंढे ज्योतीनगरात राहत होते. त्यांची पत्नी व दोन मुले पुण्याला राहतात. ते मूळचे सौंदरे (ता. बार्शी) येथील होते. ५ फेब्रुवारीला रात्री लोंढे, विशाल आणि आकाशने दोन महिलांसोबत दौलताबादच्या एका फार्महाऊसवर पार्टी केली. पार्टीनंतर दोन्ही महिला गेल्यावर तिघे फार्महाऊसबाहेर पडले. नगरनाक्यावरून छावणी लोखंडी पूल ओलांडल्यानंतर विशालने बंदूक लोंढेंच्या कानाला लावत गोळी झाडली. ही बंदूक लोंढेंचीच होती, जी पार्टीदरम्यान विशालने काढून घेतली होती. हत्येनंतर करणला बोलावून घेत ६ फेब्रुवारीला सकाळी ६ ते ७ दरम्यान गेवराई तांडा येथे आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...
छत्रपती संभाजीनगरात २५ मार्चला रोजगार मेळावा, विविध कंपन्या भरणार २२८ रिक्त पदे
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना
वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software