- News
- उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती स...
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : येत्या कालावधीत उन्हाळ्यात तापमान वाढ होऊन त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. उष्मा लाटांपासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ३ वाजे दरम्यान शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करा. हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.
उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड- थंड पेये घेऊ नका. दुपारी १२ ते ३ या वेळे दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. उष्मा लाटेपासून स्वतःचा व आपल्या आप्तेष्टांच्या बचावासाठी अशा उपाययोजना अवलंबाव्या, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या, सिल्लोड तालुक्यातील सारोळ्याची घटना
By City News Desk
Latest News
23 Mar 2026 20:22:25
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...

