दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पतीचा जागीच मृत्यू, पत्नी-मुलगा गंभीर जखमी, पैठणजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी, मुलासह एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पैठण- शेवगाव रस्त्यावरील चनकवाडी फाट्याजवळ रविवारी (२२ मार्च) रात्री आठच्या सुमारास घडली.

जितेंद्र हरिश्चंद्र काळे (वय ३२ वर्षे, रा. खडका मडका, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दोन्ही दुचाकींची धडक इतकी जोरात होती, की चारही जण रस्त्यावर फेकले गेले. जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी सावित्रा जितेंद्र काळे (वय २७) व मुलगा निखिल जितेंद्र काळे (वय ६) यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला. त्याचे नाव समजू शकले नाही. ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पैठण पोलिसांनाही कळवले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव यांनी सहकाऱ्यांसह येऊन जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविले. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही दुचाकी वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात घेण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...
छत्रपती संभाजीनगरात २५ मार्चला रोजगार मेळावा, विविध कंपन्या भरणार २२८ रिक्त पदे
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना
वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software