हातभट्टी दारूने घेतला २५ वर्षीय तरुणाचा बळी!; बिडकीनजवळील घटना, ग्रामस्थ आक्रमक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अवैध हातभट्टी दारू विक्रीच्या अड्ड्याजवळ रविवारी (२२ मार्च) दुपारी दीडच्या सुमारास २५ तरुणाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्याने पैठण तालुक्यातील ७४ जळगाव फाट्यावर खळबळ उडाली.

विष्णू बबन मोरे (वय २५, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अति दारू सेवनाने मृत्यू झाल्याची चर्चा असल्याने संतप्त नातेवाइक व ग्रामस्थ दारू अड्ड्यावर धडकले. त्यांचा संताप अनावर होण्याची शक्यता होती. वेळीच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. अवैध दारू अड्डे तत्काळ उद्‌ध्वस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. विष्णूचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात आणला. घटनेची नोंद बिडकीन पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...
छत्रपती संभाजीनगरात २५ मार्चला रोजगार मेळावा, विविध कंपन्या भरणार २२८ रिक्त पदे
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना
वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software