जेवणाची ऑर्डर द्यायची म्हणून बोलावले, चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत केटरिंग व्यावसायिकाला लुटले!, सातारा परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केटरिंगचा व्यवसायिकाला ऑर्डर द्यायची असल्याचे कॉलवर सांगून भेटायला बोलावले. व्यावसायिक भेटायला गोलवाडी परिसरातील प्रभू हॉटेलच्या मागील गल्लीत येताच त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून कानातील सोन्याची बाळी, मोबाइल आणि रोख रक्कम हिसकावून चौघांनी पळ काढला. ही धक्कादायक घटना बुधवारी (१८ मार्च) रात्री ८ च्या सुमारास घडली. ही घटना आता उजेडात आली असून, सातारा पोलिसांनी चौघा लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सागर प्रकाश सरदार (वय ३२, रा. सुदर्शन सोसायटी, वेदांतनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तक्रारीनुसार, १७ मार्चला दुपारी त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला. तुम्ही खुलताबादला बनवलेली साबुदाना खिचडी आम्हाला खूप आवडली. आमच्याकडे ३०० लोकांच्या जेवणाची ऑर्डर वास्तुशांतीनिमित्त द्यायची आहे, असे समोरील व्यक्तीने सांगितले. सागर यांनी येऊन भेटतो, असे सांगितल्यावर परत त्याच नंबरवरून त्या व्यक्तीने १८ मार्चला सायंकाळी मेनू ठरविण्यासाठी त्यांना गोलवाडी परिसरातील प्रभू हॉटेलच्या मागील गल्लीत बोलावले. सागर तेथे गेले. मात्र बराच वेळ कोणीच आले नाही. वाट पाहून सागर परत फिरले असता पुन्हा कॉल येऊन तेथेच येण्यास सांगण्यात आले. सागर पुन्हा तिथे गेले, त्याचवेळी दुचाकीवरून दोघे आले.

सागर यांनी त्यांच्याशी चर्चा सुरू केली असता दोघांनी घरीच चला, त्या ठिकाणी भाऊ आहेत. तेथेच मेनू ठरवू, असे म्हटले. हॉटेलमागील गल्लीत आणखी दोघे थांबलेले होते. त्यातील एकाने सागर यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. इतरांनी तोंड दाबून तोंडात रूमाल कोंबत लाकडी दांडा व लोखंडी रॉडने बेदम मारहाण सुरू केली. नंतर सागर यांच्याकडील ५५ हजार २०० रुपये, ४ ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील बाळ्या, मोबाइल चौघा लुटारूंनी हिसकावला आणि पळून गेले. सागर जखमी झाले. रात्री १० वाजता घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...
छत्रपती संभाजीनगरात २५ मार्चला रोजगार मेळावा, विविध कंपन्या भरणार २२८ रिक्त पदे
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना
वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software