कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरासमोर कार उभी केल्यावरून शेजाऱ्याने आधी वाद घालत नंतर २० जणांसह घरात घुसून पूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली. ही घटना सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी कॉलनीत रविवारी (२२ मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

सय्यद हसीब सय्यद कैसरउ‌द्दीन (वय ३८, रा. एसटी कॉलनी) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई, वडील, पत्नी मुलाबाळासह तसेच भाऊ सय्यद उमेर त्यांच्या कुटुंबासह एकत्र राहतात. फर्निचरचे दुकान रॉयल किचन केअर सोल्युशन, जिन्सी रोड येथे असून, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी Aसायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्व जण घरी असताना त्यांचे चुलत भाऊ ओवेस सय्यद रियाजउ‌द्दीन (रा. मदनीचौक, सेंट्रल नाका रोड) हे हसीब यांचे वडील आजारी असल्याने त्यांना बघण्यासाठी आले होते. ओवेस यांनी त्यांची स्कोडा कार घरासमोरील रोडवर लावली. घरासमोर राहणाऱ्या शम्मू शेख याने ओवेस यांच्याशी गाडी रोडवर लावण्यावरून वाद घालायला सुरुवात केली.

सय्यद हसीब हे आवाज ऐकून तेथे गेले. शम्मू शेखला सांगितले, की फक्त १०  मिनिटांसाठी गाडी लावू द्या. त्यावर शम्मू शेख याने हसीब व ओवेस यांना शिवीगाळ केली. हसीब हे त्याला समजावून सांगून घराच्या पार्किंगमध्ये आले. त्याचवेळी मागून शम्मू शेख, त्याचा मुलगा शेख आमेर, शेख मुजाहेद, शारुख, सैफ, मुज्ताबा, वाजेद कुरेशी, फैज, अन्साम, जांभळ्या रंगाचे टी शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती व इतर ८ ते १० धावत आले. त्यांनी हसीब यांना हाताचापटाने मारहाण केली. शारुख व सैफ यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. हसीब यांची आई शमशाद बेगम व पत्नी सना कौसर व दोन मुले हसनैन व हस्सान यांनाही त्यांनी हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

वाजेद कुरेशी याने लाकडी दांड्याने डोक्यात डाव्या बाजूला मारल्याने टेंगूळ आले. त्याचवेळी हसीब यांचे भाऊ सय्यद उमेर आले असता त्यांनाही जमिनीवर पाडून हाताचापटाने, लाथाबुक्क्याने पाठीवर, गळ्यावर, पोटावर मारहाण करण्यात आली. नंतर सर्व जण निघून गेले. हसीब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सिटी चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शम्मू शेख व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजीत दगडखैर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाचे टॅगिंग सक्तीचे, जनावरांच्या वाहतुकीवर प्रशासनाची राहणार करडी नजर!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...
छत्रपती संभाजीनगरात २५ मार्चला रोजगार मेळावा, विविध कंपन्या भरणार २२८ रिक्त पदे
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून छत्रपती संभाजीनगरकरांना मार्गदर्शक सूचना जारी
कार पार्किंगवरून २० जणांचा जमाव घरात घुसला अन्‌ कुटुंबाला केली बेदम मारहाण!; सिटी चौक परिसरातील एसटी कॉलनीतील घटना
वडील वारले, आईनेही दुसरे लग्न केले, काक-काकू सांभाळत असतानाच १६ वर्षीय मुलाचे झालेय अपहरण, सिटी चौक परिसरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software