- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध दाम्पत्यांच्या घरांवर चोरांची पाळत!; आता वेदांतनगरात वृद्ध दाम्पत्याचे
छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध दाम्पत्यांच्या घरांवर चोरांची पाळत!; आता वेदांतनगरात वृद्ध दाम्पत्याचे घर फोडून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास!!, सातव्या घटनेने चिंता वाढली
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांत सातत्याने वृद्ध एकटे-दुकटे राहत असलेल्या घरांना चोर लक्ष्य करत आहेत. सुदैवाने वृद्ध घरी राहत नसताना ते आपली कामगिरी पार पाडत आहेत. मात्र वाढत्या घटनांमुळे चिंता निर्माण होत असून, भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात तब्बल ६ घटना अशा समोर आल्या आहेत, आता सातवी घटना वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनील अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी (२० मार्च) सायंकाळी समोर आली. वृद्ध दाम्पत्य पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिन्यांसह ३ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
१. किरण बालाजीराव कुलकर्णी (वय ६५, रा. प्रतापनगर, कासलीवाल रेसिडेन्सी, उस्मानपुरा) व पत्नीसह पुणे येथे मुलाला भेटायला गेले असता चोरट्यांनी दागदागिन्यांसह १ लाख ६ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे १८ मार्चला समोर आले. या घटनेचा तपास उस्मानपुरा पोलीस करत आहेत.
२.सुरेश बापूराव खडके (वय ७१, रा. श्रेयनगर, श्रीराम बिल्डिंग, उस्मानपुरा) व त्यांचे भाऊ रमेश यांचे घर १९ मार्चला सायंकाळी चोरट्यांनी फोडून दोन्ही घरांतील एकूण ८० हजार रुपये चोरून नेले. या घटनेचा तपास उस्मानपुरा पोलीस करत आहेत.
३.सन्मित्र कॉलनीतील विजयालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये ६ मार्चला दुपारी डॉ. सुधाकर सोन्याबापू शेळके (वय ५६, रा. विजयालक्ष्मी अपार्टमेंट, सन्मित्र कॉलनी) व डॉ. जयश्री या दाम्पत्याचे घर फोडून चोरट्याने ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. क्रांती चौक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
४.सेंट्रल एक्ससाइज ऑफिसमधून निवृत्त झालेले लक्ष्मीकांत भास्करराव पाचपोर (वय ६०,रा. सुयोग अपार्टमेंट समाधान कॉलनी जिल्हा न्यायालयामागे) यांचे घर चोरट्यांनी २५ फेब्रुवारीला दुपारी २ ते सायंकाळी ५ दरम्यान फोडून ५ तोळे सोने चोरून नेले. वेदांतनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
५.सेवानिवृत्त न्यायाधीश हेमंत मनोहर देशपांडे (वय ६३, रा. मल्हार बिल्डिंग, गुरुप्रसादनगर, आदर्श सोसायटी फेस ४, देवळाई परिसर छत्रपती संभाजीनगर) यांचे घर चोरट्यांनी फोडल्याचे २५ डिसेंबरला समोर आले. या घटनेचा तपास चिकलठाणा पोलीस करत आहेत.
६.अरुणा पंढरीनाथ पाडळकर (वय ७५) एकट्याच उल्कानगरीत राहतात. घराच्या कुलूप लावून लेक-सुनेला भेटण्यासाठी पुण्याला गेल्या असता चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचा तपास जवाहरनगर पोलीस करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या, सिल्लोड तालुक्यातील सारोळ्याची घटना
By City News Desk
Latest News
23 Mar 2026 20:22:25
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...

