Full Story : विद्यार्थिनीला पेईंट गेस्ट ठेवून वारंवार बलात्‍कार; प्रा.डॉ.अशोक बंडगर विद्यापीठाच्या सेवेतून अखेर बडतर्फ!, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण…विद्यार्थिनी बुलडाण्यातून छत्रपती संभाजीनगरात कशी आली होती…

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यार्थिनीला घरात पेइंग गेस्ट ठेवून तिच्यावर वारंवार बलात्‍कार करणाऱ्या प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले आहे. या प्रकरणात सुरुवातीला त्याला निलंबित केले. सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या समितीने विभागीय चौकशी केल्यानंतर डॉ. बंडगर दोषी आढळला. त्‍यामुळे आठवड्यात कुलगुरूंच्या आदेशाने कुलसचिवांनी त्‍याच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यार्थिनीला घरात पेइंग गेस्ट ठेवून तिच्यावर वारंवार बलात्‍कार करणाऱ्या प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले आहे. या प्रकरणात सुरुवातीला त्याला निलंबित केले. सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या समितीने विभागीय चौकशी केल्यानंतर डॉ. बंडगर दोषी आढळला. त्‍यामुळे आठवड्यात कुलगुरूंच्या आदेशाने कुलसचिवांनी त्‍याच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.

विद्यापीठातील विद्यार्थिनीवर बलात्‍काराचे प्रकरण समोर आल्यावर तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी डॉ. बंडगरला तत्काळ निलंबित केले होते. त्यानंतर त्याच्या विभागीय चौकशीसाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश पी. एस. परांजपे यांची समिती नेमली होती. समितीच्या चौकशीत डॉ. बंडगर याच्याविरोधात असलेले सर्व आरोप सिद्ध होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. विद्यमान कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी चौकशी अहवाल स्वीकारला. त्यानुसार ८ नोव्हेंबर २०२४ रोजी त्‍याला विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

काय आहे प्रकरण…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अशोक गुराप्पा बंडगर व त्याची पत्नी पल्लवी अशोक बंडगर (रा. विद्युत कॉलनी) यांच्या विरोधात विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा बेगमपुरा पोलीस ठाण्यात २५ एप्रिल २०२३ रोजी दाखल झाला होता. विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार शासकीय कला महाविद्यालयात २०१९ ते २०२१ मध्ये शिक्षण घेताना तृतीय सत्रात सर्व्हिस कोर्ससाठी एका विषयाची निवड केली होती. त्याची शिकवणी डॉ. बंडगर हा ऑनलाइन घेत होता. तेव्हा पीडितेची त्याच्यासोबत ओळख झाली. त्याने चौथ्या सत्रात लघुप्रबंध सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेला मार्गदर्शन केले.

पीडितेने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, असा सल्ला घेतला, तेव्हा बंडगरने विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला चित्रपटात काम देण्याचेही आमिष दाखवले. पीडितेला स्वतःच्या घरीच पेइंग गेस्ट म्हणून घेऊन गेला. जुलै २०२२ मध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्ती केली. हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस पीडितेने सांगितला. तेव्हा तिने ‘सर्व मला मान्य आहे. तू माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा’ असे सांगितले. त्यानंतर बंडगरची पत्नीच तिला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत होती.

एकदा अत्याचाराच्या वेळी पीडिता बेशुद्ध पडली. तिची प्रकृती बिघडल्यामुळे ती गावी गेली. तिला परत येण्यासाठी दाम्पत्याने दबाव टाकला, पण पीडिनेने नकार देऊन अखेर सर्व घटनाक्रम वडिलांसह बहिणीला सांगितला. वडिलांनी याविषयी विद्यापीठाकडे तक्रार करण्यास सांगितले. विद्यापीठाने प्राथमिक चौकशी करीत पीडितेला पोलिसांत जाण्याविषयी लेखी पत्र दिले. त्यानंतर पीडितेने बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदवली. डॉ. अशोक बंडगर याने पीडितेची पात्रता नसतानाही अनधिकृतपणे प्रवेश मिळवून दिला होता. मुख्य आरोपीच्या पत्नीनेही पीडितेसोबत अश्लील चाळे केल्याचा उल्लेख तक्रारीत केला होता.

पीडित तरुणी मूळची बुलडाण्याची…
प्रा. बंडगर याने प्राध्यापकाची नोकरी करत असतानाच पत्नीच्या मदतीने मसाला उद्योग सुरू केला होता. या उद्योगात जम बसल्यानंतर लाखोंची उलाढाल होऊ लागली. त्यातून आलिशान गाडी घेतली. सर्व प्रकारच्या सुख-सुविधा होत्या. मात्र मुलगा नसल्याची खंत पती-पत्नीला वाटत होती. वैद्यकीय उपाय कामी न आल्याने त्यांनी दुसराच विचार सुरू केला. त्यातून २०१९ मध्ये ऑनलाइन ओळख झालेल्या नांदुरा (जि. बुलडाणा) येथील तरुणीला हेरले. तिच्या आईचे निधन झालेले आहे. वडील सतत आजारी असतात. बहिणी आणि छोटा भाऊ असल्याचे पाहून प्रा. बंडगरने तिला जाळ्यात ओढले. सुरुवातीला घरीच पेईंग गेस्ट म्हणून ठेवल्यानंतर पीडितेला दोघांनी आई- वडिलांसारखी वागणूक दिली. त्यांच्या दोन मुलींमध्ये तिसरी मुलगी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, दोघांच्या मनात वेगळेच होते.

तिचा विश्वास संपादन करण्यासाठी आर्थिक व्यवहार सांभाळण्यास दिले. त्यानंतर बलात्‍कार सुरू केला. पीडित तरुणी दोघांच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळली होती. तिच्यावर गर्भवती राहण्यासाठी दोघांकडून दबाव आणला जात होता. त्यातून तिने आत्महत्या करण्याचाही विचार केला होता. मात्र, तिच्या मैत्रिणींनी समजूत काढल्यानंतर मानसोपचार तज्ञांकडे तिने उपचार घेतले होते. तज्ञाने तिला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. पीडित विद्यार्थिनी गावी गेली होती. तिला वारंवार फोन करून दोघे परत बोलावत होते. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने १९ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या विशाखा समितीकडे तक्रार नोंदवली. ही तक्रार पाहून कुलगुरूंना धक्काच बसला. त्यांनी मुलीला बोलावून घेत धीर दिला. विशाखा समितीकडून दोन्ही आरोपींना नोटीस जाताच त्यांनी परीक्षा भवनमध्ये समिती सदस्याकडे जाऊन गोंधळ घातला. त्यानंतर मुलीच्या गावी जाऊन तोच प्रकार केला. त्याची नोंदही बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software