EXCLUSIVE : वडिलांच्या घामाचं फळ... लाडसावंगीच्या सौरभला शिकतानाच मिळालं १५ लाखांचं पॅकेज!; आयटी इंजिनिअरिंग करतोय, मल्टिनॅशनल आयटी कंपनीने दिली ऑफर!!

On

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वडील शेतकरी, जनरल स्टोअरचं दुकान... बिकट परिस्थिती, पण जिद्द अन्‌ मेहनतीची तयारी इतकी की परिस्थितीनेही त्‍याच्यापुढे हार मानली... तो आनंदाचा क्षण आला आहे, ज्‍या क्षणाने वडिलांच्या मेहनतीला फळं दिलंय..., तेही इतकं मोठं की, त्‍यांच्याच काय पण अवघ्या गावाच्याही आनंदाला पारावार उरलेला नाही... हो, लाडसावंगीच्या सौरभ पंढरीनाथ साबळे या तरुणाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतानाच जागतिक स्तरावरील Zodiac या आयटी कंपनीत १५ लाखांची नोकरी लागली आहे... कॅम्‍प्‌स इंटरव्ह्यूमध्ये त्‍याची निवड झाली अन्‌ ही बातमी घरी सांगताना सौरभला अक्षरशः आनंदाश्रू अनावर झाले...

सौरभ सध्या हिमाचल प्रदेशातील ट्रिपल आयटी (उना) येथे शिक्षण घेत आहे. सौरभच्या वडिलांकडे केवळ दीड एकर शेती आहे. या अल्‍पशा शेतीतून येणाऱ्या उत्‍पादनावर अवलंबून न राहता या कुटुंबाने गावात जनरल स्टोअर टाकले आहे. वडील करत असलेल्या कष्टाची जाणीव सौरभने लहानपणापासूनच ठेवली. तो शाळेत असल्यापासून हुशार सिद्ध झाला. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करून सौरभ ध्येयाकडे वाटचाल करत राहिला. बारावी झाल्यानंतर त्याने इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला. शिकत असतानाच त्याने वेगवेगळ्या प्रकल्‍पांवर काम करत स्वतःचे कौशल्य वाढवले. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची आवड यामुळे त्याला आता सर्वोच्‍च संधी मिळाली आहे.

 कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याने मुलाखतकारांना असे काही प्रभावित केले, की त्‍याला थेट १५ लाखांचे पॅकेज Zodiac कंपनीने देऊ केले आहे. याचमुळे सौरभ  गावातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तरी योग्य दिशा, कठोर मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असा संदेश सौरभने विद्यार्थ्यांना दिला आहे. नुकताच गावातील सरपंच व प्रशालेतर्फे त्याचा सत्कार ठेवण्यात आला होता. मुख्याध्यापक नजन, रमेश शिंदे, रवींद्र पडुळ, प्रवीण पडुळ, बाबासाहेब पवार, विलास पवार, संजय भालेराव, शिक्षक गुंजाळ तसेच गावातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. सौरभला दोन बहिणी असून, त्‍यांचे लग्‍न झाले आहे.

WhatsAppImage2025-08-19at7.54.36PM

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software