चालकाला फिट आल्याने नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर!, सेव्हन हीलजवळील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कार चालवतानाच अचानक फिट आल्याने चालकाचे स्टिअरिंगवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकावर चढली. सुदैवाने दाम्पत्याने सीटबेल्ट लावलेले असल्याने सर्व एअरबॅग्ज उघडल्या गेल्या आणि गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना सेव्हनहीलजवळील राज पेट्रोल पंपासमोर बुधवारी (२७ ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याच ठिकाणी वारंवार अपघात होत असून, वाहने दुभाजकावरच चढत आहेत. याची कारणे शोधून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सूरज खुशालसिंह राजपूत (वय ३२, रा. हनुमाननगर) आणि पत्नी पल्लवी यांच्यासह कारने (क्र. एमएच २० ईजे ४३३४) हायकोर्टाकडून आकाशवाणीकडे जात होते. सेव्हन हिल उड्डाण पुलावर चढण्याच्या तयारीत असतानाच राज पेट्रोलपंपासमोर त्यांना अचानक फिट येण्याचा त्रास सुरू झाला. कारवरील नियंत्रण सुटून त्यांचा पाय एक्सलेटरवर पडला अन्‌ कार दुभाजकावर जोरात आदळली. दाम्‍पत्‍याने सीट बेल्ट लावलेला होता. त्यामुळे अपघात होताच एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे दाम्‍पत्‍य सुरक्षित राहिले. माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मोतीराम होलगडे, अमोल आहेर, मदन गोरे यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मदतकार्य केले. कार रस्‍त्‍याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संशयित अरुण गव्हाडच्या पाठिशी उद्धव ठाकरे गट राहणार ठाम!; शहरभर संताप तरी डोक्‍यावर राहणार हात, ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेमुळे तीव्र असंतोष

Latest News

संशयित अरुण गव्हाडच्या पाठिशी उद्धव ठाकरे गट राहणार ठाम!; शहरभर संताप तरी डोक्‍यावर राहणार हात, ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेमुळे तीव्र असंतोष संशयित अरुण गव्हाडच्या पाठिशी उद्धव ठाकरे गट राहणार ठाम!; शहरभर संताप तरी डोक्‍यावर राहणार हात, ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेमुळे तीव्र असंतोष
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ६ मधील संभाजी कॉलनीत प्रमोद रमेश पाडसवान (वय ३८) यांच्या हत्‍येप्रकरणात ४ साक्षीदारांचे...
गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
चालकाला फिट आल्याने नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर!, सेव्हन हीलजवळील घटना
त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software