- Marathi News
- एंटरटेनमेंट
- Chanderi News : हो, मी एका अजेंड्यावर चित्रपट बनवतो...; ‘द बंगाल फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्...
Chanderi News : हो, मी एका अजेंड्यावर चित्रपट बनवतो...; ‘द बंगाल फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे स्पष्ट शब्द
On

चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री द बंगाल फाइल्स या चित्रपटामुळे सध्या वादात सापडले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच गोंधळ उडाला. लाँचिंग इव्हेंटच्या दिवशी काही लोकांनी कोलकात्याच्या एका हॉटेलमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर दिग्दर्शकाविरुद्ध एफआयआरदेखील नोंदवण्यात आला. अलिकडेच विवेक अग्निहोत्री, अभिनेत्री पल्लवी जोशी आणि निर्माता अभिषेक अग्रवाल दिल्लीला आले तेव्हा त्यांनी या वादावर माध्यमांशी उघडपणे संवाद साधला...
द काश्मीर फाइल्स, द बंगाल फाइल्स बनवले आहेत. तर येत्या काळात ते गुजरात, मुझफ्फरनगर आणि मेरठ दंगलींवरही चित्रपट बनवतील का? या प्रश्नाच्या उत्तरात विवेक यांनी कडवट स्वरात म्हटले, की यावर चित्रपट बनवण्याची अपेक्षा करणाऱ्यांचा मी आभारी आहे. मी एक चित्रपट निर्माता आहे, देशाचा पंतप्रधान नाही. संपूर्ण चित्रपट उद्योगात २०० ते ३०० चित्रपट दिग्दर्शक आहेत आणि तुम्हाला असे वाटले की संपूर्ण भारतात होणाऱ्या दंगलींवर चित्रपट बनवण्यासाठी मी एकमेव सक्षम आहे. तथापि, त्यांनी या विषयांवर चित्रपट बनवणार की नाही हे स्पष्ट केले नाही.
विवेक अग्निहोत्री विशिष्ट उद्देशाने चित्रपट बनवतात का? दिग्दर्शक म्हणाले, की हो, हा माझा उद्देश आहे आणि मी उघडपणे म्हणतो की माझा एक अजेंडा आहे आणि मी हे कधीही लपवलेले नाही. एक चित्रपट निर्माता म्हणून, मी भारताच्या कथा सांगतो ज्यामध्ये सत्य दाबले गेले होते, जसे आम्ही ताश्कंद फाइल्स किंवा काश्मीर फाइल्समध्ये लोकांना सांगितले होते. आम्ही दोन्ही चित्रपटांमध्ये काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे सांगितले नाही. पण माझे ध्येय स्पष्ट आहे की मी हिंदू संस्कृतीवर चित्रपट बनवतो, म्हणून मी हिंदूंच्या इतिहासावर चित्रपट बनवतो. मी स्वतःला इस्लामिक किंवा ख्रिश्चन इतिहासावर चित्रपट बनवण्यास सक्षम मानत नाही. कारण अनेक लोकांनी त्यावर चित्रपट बनवले आहेत. ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार व सिम्रत कौरसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
By City News Desk
Latest News
29 Aug 2025 20:31:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या...