सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी दहाला अन्वी (ता. सिल्लोड) येथे समोर आली. 

सागर रमेश गावंडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software