- Marathi News
- जिल्हा न्यूज
- घाटावर कपडे धुतानाच महिलांनी एकमेकींना धुतले!; दोघींचे पतीही भिडले...गंगापूरच्या वरझडीची घटना
घाटावर कपडे धुतानाच महिलांनी एकमेकींना धुतले!; दोघींचे पतीही भिडले...गंगापूरच्या वरझडीची घटना
On
4.jpg)
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटावर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकींना बुकलून काढायला सुरुवात केली. कपडे धुण्याचे सोडून त्यांनी एकमेकींना पार धुवून टाकले. ते पाहून दोघींचे पती धावून आले. त्यांनी पत्नीचे भांडण सोडविण्याऐवजी आपसातच मारामारी केली. शिल्लेगाव पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
गंगापूर तालुक्यातील वरझडी येथील ही घटना आहे. वर्षा वाल्मीक कापसे (वय ३०, रा. वरझडी) शनिवारी (२३ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास गावातील घाटावर कपडे धुण्यासाठी आल्या. तिथे शोभाबाई विजय व्यवहारे हिने तू घाटावर कपडे धुण्यासाठी कशाला झाली, असे विचारून वाद उकरून काढला. त्यामुळे शोभाबाई आणि वर्षा यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. त्यांच्या भांडणात शोभाबाईचा पती विजय चत्रू व्यवहारे हाही पडला. त्याला विरोध करायला वर्षा यांचा पतीही सहभागी झाला. एकीकडे महिलांचे अन् दुसरींकडे त्यांच्या पतीचे ढिश्यूऽम ढिश्यूऽम झाले. लाथाबुक्क्यांनी एकमेकांना त्यांनी बदडून काढले. वर्षा यांच्या तक्रारीवरून व्यवहारे दाम्पत्याविरोधात शिल्लेगाव पोलिसांनी शनिवारी दुपारी तीनला गुन्हा दाखल केला. अधिक तपास केला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
गुड न्यूज : गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स, वाहनांनी आता घाटीत रुग्णांची नेआण!
By City News Desk
छ. संभाजीनगरचे ३ वकील झाले मुंबई हायकोर्टाचे जज !
By City News Desk
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
By City News Desk
Latest News
28 Aug 2025 22:31:31
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...