गंगापूर तालुक्‍यातही मतदार यादीत घोळ!; २० हजारांवर मतदारांबद्दल शंका? रांजणगाव शेणपुंजीच्या सरपंचांचे नाव चक्क ३ वेगवेगळ्या यादींत

On

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण तालुक्‍यात २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गंगापूर तालुक्‍यातही तसेच चित्र असल्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. थोडेथोडके नव्हे तर २० हजारांवर मतदारांचे नाव दोन ठिकाणी असल्याचा संशय आहे. त्‍यामुळे ही दुबार नावे वगळण्याची आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

रांजणगाव शेणपुंजीच्या सरपंच योगिता महालकर यांचे नाव तीन यादींत समोर आले आहे. हा घोळ युथ काँग्रेसचे खुलताबाद-गंगापूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अलीम सय्यद यांनी समोर आणला असून, निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका व्यक्तीचे नाव एकाच मतदार यादीतच असावे. मात्र एकापेक्षा अधिक यादीत नावे असल्याने विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दुबार नावांची अनेक प्रकरणे आमच्या निदर्शनास आली असून, २० हजार असे मतदार असल्याची दाट शक्यता अलीम सय्यद यांनी वर्तवली आहे. आम्ही सर्व पुरावे निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे ते म्‍हणाले. या प्रकारामुळे एका व्यक्तीकडून अनेकदा मतदान झाल्याची शंकाही त्‍यांनी व्यक्‍त केली.

मतदार यादीची तयारी व पडताळणी करणारे ग्रामसेवक, तलाठी आणि निवडणूक शाखेतील अधिकारी याला जबाबदार असून, अशा चुका हेतुपुरस्सर केल्यात का, याचा तपास होण्याची आवश्यकता आहे. पैठणनंतर गंगापूरमध्येही असा गंभीर प्रकार समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. अलीम सय्यद म्हणाले, की कोणाला लक्ष्य करण्याचा उद्देश नाही. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखणे सर्वांची जबाबदारी आहे. सरपंचांचेच नाव तीन ठिकाणी असेल, तर सामान्य मतदारांबद्दल काय अवस्था असेल?, असा प्रश्न त्‍यांनी केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software