मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एकीकडे नागरिकांत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असताना, दुसरीकडे वाळूज महानगर-१ प्रवेशद्वाराजवळील बसथांब्यावर एक युवकाचे अक्षरशः मरण समीप आले होते. अंतिम घटका मोजत असतानाच, त्‍याच्यासाठी पत्रकार अशोक साठे अन्‌ सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन देवदूत बनून आले. त्‍यांनी तातडीने या युवकाच्या मदतीसाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळवले. पोलिसांनीही तत्‍परतेने धाव घेतली. सर्वांच्या सहकार्याने युवकाला घाटी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्‍याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

नक्की काय झालं?
अंदाजे ३०-३२ वर्षीय युवक बेशुद्धावस्थेत निपचित पडलेला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास पत्रकार अशोक साठे यांचे लक्ष त्‍याच्याकडे वेधले गेले. त्‍यांनी जवळ जाऊन बारकाईने पाहिले असता त्‍याचा श्वास सुरू होता. तीन दिवसांपासून तो युवक तेथेच पडून असल्याचे समजले. साठे यांनी तत्‍काळ सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन यांना कळवले. जैन यांनी काही मिनिटांतच घटनास्थळ गाठले. युवकाची प्रकृती पाहून लगेचच आधी वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आले.

पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी तातडीने पथक घटनास्‍थळी पाठवले. तोपर्यंत जैन यांनी १०८ वर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. काही मिनिटांतच रुग्णवाहिका चालक राजू गोपीनाथ रोकडे व डॉ. विवेकानंद माने घटनास्थळी आले. युवकाला रुग्णवाहिकेत टाकून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. साठे आणि जैन यांनी माणुसकीने जपल्याने एक जीव वाचल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software