५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : चारचाकी घेण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आण, अशी मागणी करून पतीसह सासरच्यांनी २२ वर्षीय विवाहितेचा छळ मांडला. देवगाव रंगारी पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कावेरी अक्षय रोकडे (वय २२, रा. शिवाजीनगर सातपूर जि. नाशिक ह. मु. जळगाव घाट ता. कन्नड) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, की तिचे लग्‍न २८ एप्रिल २०२४ रोजी अक्षय तुकाराम रोकडे (रा. शिवाजीनगर सातपूर जि. नाशिक) याच्यासोबत झाले होते. तिचा पती खासगी कंपनीत मजुरी करतो. लग्‍नानंतर दोन महिने सासरच्या लोकांनी तिला चांगली वागणूक दिली. घरात पती, सासरा तुकाराम रावसाहेब रोकडे, सासू निर्मला तुकराम रोकडे, भाया कृष्णा तुकाराम रोकडे, जाऊ रोहिणी कृष्णा रोकडे राहत होते. नणंद रुपाली रामकृष्ण साळुंके (रा. दहेगाव ता. वैजापूर), नणंद सोनाली गणेश कोराळे (रा. न्यायडोंगरी ता. चाळीसगाव) याही घरी येत जात होत्या. पती, सासू, सासरे, भाया, जाऊ, दोन्ही नणंदा दरवेळेस कावेरीला म्हणायचे, की तुला इथे राहायचे असेल तर माहेरून पाच लाख रुपये नवीन चारचाकी गाडी घेण्यासाठी व घराचे कर्ज फेडण्यासाठी घेऊन ये.

नसता येथे राहू नको. कावेरीने पैसे आणण्यास असमर्थता व्यक्‍त केली असता पती व सासरचे लोक तिला मारहाण करू लागले. शिवीगाळ करून उपाशीपोटी घराबाहेर काढून देत होते. तिने ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर ते तिच्या घरी आले. त्‍यांनी तिच्या पती व सासरच्यांना समजावून सांगितले. मात्र त्‍यावर ते म्हणाले, की पैसे देत असाल तरच मुलीला येथे ठेवा नाही तर तुमच्या मुलीला घेऊन जा. आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ. पुन्हा तिला इकडे आणून सोडले तर तिला मारून टाकू, अशी धमकी दिली. कावेरीच्या वडिलांनी त्‍यांना बरेच समजावून सांगितले. मात्र त्यांनी काहीएक ऐकले नाही. त्‍यानंतर ते कावेरीला घेऊन जळगावघाट येथे आले. ८ फेब्रुवारी २०२५ पासून कावेरी राहत आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशरसिंह राजपूत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software