छ. संभाजीनगरमध्ये भरपावसात निघाला काँग्रेसचा मशाल मोर्चा, मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ घोषणा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देशात मतदान चोरी झाल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेसने गुरुवारी (१४ ऑगस्ट) सायंकाळी छत्रपती संभाजीनगरात मशाल मोर्चा काढला.

शहागंज येथील महात्मा गांधी पुतळा ते सुभेदारी गेस्ट हाउसजवळील स्व. राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत मोर्चा निघाला. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. सायंकाळी भरपावसात हा मोर्चा निघाला. व्होट चोर, खुर्ची छोड, संविधान व लोकशाहीचा विजय असो, 'निवडणूक आयोग जवाब दो अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात माजी मंत्री अनिल पटेल, कमाल फारुकी, प्रा. डॉ. मोहन देशमुख, अॅड. सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, इब्राहिम पठाण, अनिस पटेल, उमाकांत खोतकर, बाळू गुज्जर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software