पत्‍नी ९ महिन्यांची गर्भवती असताना कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल!, गंगापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : कर्जबाजारीपणाला कंटाळून शंकर संजय शिंदे (वय २८, रा. शहापूर, ता. गंगापूर) या युवा शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खादगाव शिवारात (ता. गंगापूर) मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारी ३.३० वाजता समोर आली.

शंकर शिंदे कुटुंबासह शहापूर शिवारात राहतात. कुटुंबियांनी त्‍यांना सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मंगळवारी रात्री उशिरा शंकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार असून, त्यांची पत्नी ९ महिन्यांची गर्भवती आहे. शंकरच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसले तरी त्याच्या नावावर असलेल्या ट्रॅक्टरच्या व इतर कर्जामुळे ते काही दिवसांपासून नैराश्येत होते. घटनेची नोंद शिल्लेगाव पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास केला जात आहे.

पैठणच्या लोहगावमध्ये विहिरीत मृतदेह आढळला...
पैठण तालुक्‍यातील लोहगाव येथील बाजारतळावरील विहिरीत मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिडकीन पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली. मृत व्यक्तीचे नाव संतोष वसंत पाबळे असल्याचे समोर आले. संतोष मंगळवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता होता. तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software