मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू

On

चौका, ता. छत्रपती संभाजीनगर (जीवन वाघ) : छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री रोडवरील चौका येथे आज, १५ ऑगस्टला ढगफुटी झाली. दुपारी २ नंतर सलग अडीच तास मुसळधार पाऊस कोसळला. त्‍यानंतर सायंकाळी सहानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यामुळे चौकासह आसपासच्या गावातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री रस्‍त्यावरून पाणी वाहू लागले असून, एक बाजू पूर्णपणे बंद झाली आहे. त्‍यामुळे फुलंब्रीकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याने येणारी जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चौकातून एक मोठा नाला वाहतो, त्‍याला पूर आल्याने नाल्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतांत मोठे पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत.
शहरात, जिल्हाभर पाऊस
दरम्‍यान, आज दिवसभरात जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरातही सकाळपासून रिमझिम सुरू होती. सायंकाळनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचे शहराच्या वेगवेगळ्या भागांतून कळविण्यात येत आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software