- Marathi News
- सिटी डायरी
- प्रशासनातील उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव ; चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना क...
प्रशासनातील उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव ; चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य : पालकमंत्री शिरसाट
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेचा, प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य नागरिक असतो. सामान्य नागरिकाचा विकास हे ध्येय ठरवूनच प्रत्येक शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्याने काम केले पाहिजे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.
.jpg)
.jpg)
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील दरी दूर व्हावी. दोघांचाही उद्देश हा जनतेला चांगली सेवा देणे हाच आहे. जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या गतीमुळे अखेर जिल्ह्याचाच फायदा होत असतो. शेवटी हे काम करताना ज्या समाजाला फायदा होतो आपणही त्याच समाजाचे घटक आहोत याची जाणीव आपण जोपासली पाहिजे. प्रत्येक काम हे आपली वैयक्तिक जबाबदारी आहे असे समजून काम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यानंतर १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले.
सन्मनित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे
1. संचालक (माहिती) किशोर रमेश गांगुर्डे
2. सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन अर्जुन भुजबळ
3. प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी रितेश भा. मते
4. उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण बाळकिशोर अर्जुन पाळे
5. अप्पर राज्यकर आयुक्त राज्य वस्तु सेवा कर जितेंद्र रामचंद्र बनसोडे
6. विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद
7. विभागीय कृषी सहसंचालक श्रीमती माधुरी रमेश सोनवणे
8. प्रादेशिक रेशीम कार्यालय डॉ. महेंद्र भिमराव ढवळे
9. विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कृष्णा फुलसिंग राठोड
10. विभागीय कामगार कार्यालय नितीन पांडुरंग पाटणकर
11. सहसंचालक लेखा व कोषागारे श्रीमती रेहाना काजी
12. प्रादेशिक उपसंचालक इतर मागस बहुजन कल्याण विभाग शेख जलील शेख मोला
जिल्हास्तरीय
1. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्रीमती मनीषा राजाराम हराळ मोरे
2. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत अरविंद आलाटे
3. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती अनघा मनीष पुराणिक
4. विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीमती निता फुले
5. सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय रंगनाथ वाघ
6. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती महेंद्र सुमन उत्तमराव हरपाळकर
तालुका उपविभागस्तरीय दुसरा टप्पा
1. उपविभागीय कृषि अधिकारी श्रीमती अश्विनी लक्ष्मण पठारे
2. तालुका कृषि अधिकारी ता. फुलंब्री भारत अरविंद कासार
3. उपविभागीय पोलीस अधिकारी ता. पैठण सिद्धेश्वर बळीराम भोरे
4. वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण ता.गंगापूर श्रीमती छाया बाणखेले
5. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) उत्तर गणेश सांडू पुगळे
6. सहायक अभियंता (सार्वजनिक बांधकम ता. पैठण) राजेंद्र रंगनाथ बोरकर
7. उप अभियंता महवितरण सवसु शहर उपविभाग वाळूज अरुण सोपानराव गायकवाड
8. सहायक अभियंता राजेंद्र रंगानाथ बोरकर
9. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय ता. खुलताबाद डॉ. प्रफुल गायकवाड
10. गट शिक्षणअधिकारी ता. पैठण श्रीराम केदार
11. उपअधिक्षक भूमिअभिलेख नीलेश राजाराम उंडे
12. गटविकास अधिकारी श्रीमती मिना रावताळे
13. तालुका कृषी अधिकारी मेघशाम शेषराव गुळवे
14.सहायक पोलीस निरीक्षक ता. कन्नड ग्रामीण रामचंद्र शामराव पवार
15. वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरन कन्नड श्रीमती प्रिया काटकर
16. बालसंरक्षण अधिकारी ता.कन्नड सतीश गोरख कदम
17. उपअभियंता पाणीपुरवठा ता. पैठण सागर विश्वासराव बेहरे
18. दुय्यम निबंधक ता. छत्रपती संभाजीनगर औदुंबर अर्जुनराव लाटे
19. उपविभागीय कृषी अधिकारी ता. वैजापूर व्यंकट सायन्ना ठक्के
20. बालविकास प्रकल्प अधिकार ता. छत्रपती संभाजीनगर रामेश्वर आत्माराम खडसे
21. सहायक पशुसंवर्धन अधिकारी पशु चिकित्सालय ता. पैठण डॉ. आझाद रामनाथ पानसरे
22. उप अभियंता सार्वजनिक कन्नड निखिल देविदास सूर्यवंशी
23. सहायक निबंधक सहकारी संस्था श्रीमती रेशमा रमाकांत दंडगव्हाळ
अवयव दाते : श्रीमती मंगल संतोष धुत, श्रीमती किर्ती एकनाथ पाटील, श्रीमती उषा अशोक वाघमारे, श्रीमती उषा शरद माटे, गोपीनाथ बालाजी कोलते, श्रीमती कौसर जहान मो. जहीर, डॉ. विजय वीर, शंशाक जैस्वाल.