- Marathi News
- एंटरटेनमेंट
- विशेष मुलाखतीत वाणी कपूर अंतर्मुख : लोक झुंडीच्या मानसिकतेने बोलतात, त्याकडे दुर्लक्ष करणे एकमेव मार...
विशेष मुलाखतीत वाणी कपूर अंतर्मुख : लोक झुंडीच्या मानसिकतेने बोलतात, त्याकडे दुर्लक्ष करणे एकमेव मार्ग!

शुद्ध देसी रोमान्स या पहिल्याच चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री वाणी कपूरला तिच्या पुढील चित्रपट बेफिक्रेसाठी तब्बल तीन वर्षे वाट पहावी लागली. आदित्य चोप्रा दिग्दर्शित असूनही, हा चित्रपटही चालला नाही. चंडीगड करे आशिकी या चित्रपटात तिने एका ट्रान्सवुमनची आव्हानात्मक भूमिका खूप चांगली साकारली होती. पण हाही चित्रपट कधी आला नि गेला कळले नाही. अलिकडेच तिचा अबीर गुलाल हा चित्रपट पाकिस्तानी अभिनेता फवाद खानमुळे वादात सापडला. एकंदरीत, कठोर परिश्रम करूनही वाणीला तिच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले आहे. वाणी कबूल करते की तिचा चित्रपट प्रवास सोपा नव्हता. अनेक वेळा तिला असा प्रश्न पडला, की ती या उद्योगासाठी बनली आहे की नाही, परंतु नंतर ती स्वतःला धीर देऊन पुढे जात राहिली...
.jpg)
मंडला मर्डर्स या तिच्या वेब सिरीजमध्ये आव्हानात्मक टप्प्यातून जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी वाणी कपूर तिच्या कारकिर्दीतील आव्हानांबद्दल म्हणते, की माझी आव्हाने लोकांना तितकीशी दिसत नाहीत. कारण ती इतकी मोठी नव्हती. स्वतःवर टीका करणे ही माझी सवय आहे. मी स्वतःशी कधी कधी खूप कठोर वागते. मी स्वतःवर दबाव निर्माण करते. बऱ्याचदा मला प्रश्न पडतो की मी या उद्योगासाठी आहे का? मी इथे असायला हवे का? मी कधी अशा ठिकाणी पोहोचेन का, की जिथे मला खऱ्या अर्थाने समाधान मिळेल? ही माझी लढाई आहे, जी मी एकट्याने लढली आहे. माझ्या आतून एक आवाज येतो की काही फरक पडत नाही. तू कठोर परिश्रम कर, जे व्हायचे आहे ते होईल. कोणतीही कसर सोडू नको. बाकीचे देवावर सोपव. आपला चित्रपट उद्योग अनिश्चिततेने भरलेला आहे. तो तुम्हाला संयम, नम्रता, चिकाटी शिकवतो. माझ्या अपयशांमधूनही मी खूप काही शिकते. जे मला अधिक मजबूत आणि एक चांगला माणूस बनवते.
.jpg)
खरी टीका आणि आवाजातील फरक
आजच्या सोशल मीडियाच्या युगात, ट्रोलिंग, नकारात्मकता, विशेषतः कलाकारांना लक्ष्य करणे सामान्य आहे. वाणी या गोष्टी कशा हाताळते? यावर ती म्हणते, की सोशल मीडियामुळे आपले जीवन थोडे बनावट, वरवरचे झाले आहे. त्याचे फायदेदेखील आहेत. हे इतके मोठे व्यासपीठ आहे ज्याद्वारे आपले जग जोडले गेले आहे, परंतु येथे आपण खूप गोष्टी पाहतो आणि आपल्या जीवनाची इतरांशी तुलना करू लागतो. यामुळे आपले स्वतःचे महत्त्व कमी होते. तुम्हाला स्वतःचे महत्त्व शोधावे लागेल, अन्यथा स्वतःला गमावणे खूप सोपे आहे. ती म्हणते, की कलाकारांसाठी सर्वकाही सार्वजनिक आहे. आपले यश सार्वजनिक आहे, आपले अपयश देखील सार्वजनिक आहे. म्हणून, कोणीही आपले मत देऊ शकते, निर्णय देऊ शकते. अशा परिस्थितीत, आपल्याला हे शहाणपण शिकावे लागेल की कोणती गोष्ट उपयुक्त आहे, ज्यातून शिकून आपण स्वतःला सुधारू शकतो आणि दुसरे म्हणजे आवाज, ज्यामध्ये लोक झुंडीच्या मानसिकतेने बोलतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे हा एकमेव मार्ग आहे. मी असे मानते की सोशल मीडियावर असणे हीदेखील एक सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे की तुमचे शब्द एखाद्यावर कसा परिणाम करत आहेत. मी त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी ध्यान करते. आपल्यासाठी एक आधार प्रणाली असणे खूप महत्वाचे आहे. अशा लोकांना तुमच्याभोवती ठेवणे महत्वाचे आहे जे तुम्हाला योग्य सल्ला देतात.
सर्व धर्मांवर विश्वास ठेवा, अंधश्रद्धेवर नाही...
वाणीची मालिका श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर आधारित आहे. तिच्या वैयक्तिक जीवनात तिला या गोष्टींवर किती विश्वास आहे? यावर ती म्हणते, मी आध्यात्मिक आहे. मी प्रत्येकाच्या देवाचा आदर करते. माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत, सर्व देव एक आहेत. मी ऊर्जेवर खूप विश्वास ठेवते. माझा असा विश्वास आहे की सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुमच्याभोवती तसेच वातावरण असते. तुम्ही नकारात्मक विचार केला तर कायम तुम्ही नकारात्मकता घेऊन वावरत असतात. त्याचा तुमच्या आयुष्यावरही परिणाम होतो. मी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. लहानपणी मी माझ्या आईला म्हणताना ऐकले आहे, की जेव्हा कुणी घराबाहेर पडत असेल तर त्याला टोकू नये. जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल तर दही खा. मी या युक्त्या खूप ऐकल्या आहेत, परंतु मी त्यांच्यावर फारसा विश्वास ठेवत नाही.