झोडेगाव जि. प. शाळेच्या २ मुलांच्या अपहरणाचा प्रयत्‍न झाल्याने खळबळ, गंगापूर तालुक्‍यातील प्रकार

On

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील झोडेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्‍न झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही विद्यार्थी १३ वर्षांचे असून, एक झोडेगावचा तर दुसरा खडक वाघलगावचा आहे. काल, २३ जुलै व आज, २४ जुलैला या घटना घडल्या. पालक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक वाघलगाव येथील १३ वर्षीय मुलगा झोडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत ८ वीत शिकतो. तो शाळेत येत असताना बुधवारी सकाळी नऊला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या तोंडावर पावडरसारखे काहीतरी फेकले. सतर्क मुलगा जवळच्याच मकाच्या शेतात पळाला. त्याच वेळेस एक गाडी आल्याने अपहरणकर्ते झोडेगावच्या दिशेने पळून गेले. दुसरी घटना आज, २४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता  घडली. झोडेगावचाच १३ वर्षीय मुलगा शाळा सुटल्यानंतर शाळेतून शेतवस्तीकडे घरी जात होता.

पोल्ट्री फार्मजवळ दुचाकीवरूनच आलेल्या दोघा मास्क घातलेल्या व्यक्तींनी त्याला थांबवून चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला व त्याचा हात पकडला. मुलाने त्‍यांना हिसका देत जवळच्याच गायरानातून धावत घरी पोहोचला. घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलाने दफ्‍तर अपहरणकर्त्यांना मारून फेकल्याने तिथेच पडले होते. आईसह शेजारी घटनास्थळी पोहोचले आणि दप्तर घरी आणले. या दोन्ही घटनांनंतर गावकऱ्यांत खळबळ उडाली असून, पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्‍यान, वृत्त लिहीपर्यंत या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांत नव्हती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!

Latest News

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक! रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्‍त्‍याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्‍डा...
कारमधून उतरल्यानंतर डॉक्‍टर कारमागे गेले, त्‍याचवेळी चालकाने जोरात रिव्हर्स घेतली, डॉक्‍टरांना धडक बसून मृत्‍यू, वाळूज MIDC तील दुर्दैवी घटना
अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वाराच्या अंगावर बाजूच्या हॉटेलमधील गरम भाजीचे पातेले सांडले!, भाजून मृत्‍यू, कटकटगेटजवळील दुर्घटना
प्रियकराच्या ब्‍लॅकमेलिंगला कंटाळून १८ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या, १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, भावसिंगपुऱ्यातील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ : ब्‍लॅकमेलर प्रेयसीची प्रियकराने केली निर्घृण हत्‍या!; पैशांसाठी बलात्‍काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची देत होती धमकी, त्‍याने डोके दगडावर आपटून दौलताबाद घाटात फेकला मृतदेह

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software