- Marathi News
- सिटी क्राईम
- कारमधून उतरल्यानंतर डॉक्टर कारमागे गेले, त्याचवेळी चालकाने जोरात रिव्हर्स घेतली, डॉक्टरांना धडक ब...
कारमधून उतरल्यानंतर डॉक्टर कारमागे गेले, त्याचवेळी चालकाने जोरात रिव्हर्स घेतली, डॉक्टरांना धडक बसून मृत्यू, वाळूज MIDC तील दुर्दैवी घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरी आल्यानंतर डॉक्टरांनी कारचालकाला कार घरात लावायला सांगितली आणि ते कारमागे गेले. त्याचवेळी कार पुढे घेण्याऐवजी चालकाने भरधाव मागे घेतली. त्यामुळे डॉक्टर कारखाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात गुरुवारी (२४ जुलै) डॉक्टरांच्या पत्नीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
६ जुलैला रात्री साडेनऊच्या सुमारास डॉ. उदयसिंह राजपूत कारने घरी आले. कारचालक अजय दसपुते सोबत होता. डॉक्टरांनी त्याला कार घरात लावायला सांगितली व ते कारमधून उतरून कारमागे रोडकडे गेले. त्याचवेळी चालक दसपुते याने कार पुढे न घेता अचानकपणे भरधाव मागे घेतली. त्यामुळे डॉक्टरांना कारची जोरात धडक लागली. त्यांना डोक्याला व उजव्या पायाला गंभीर मार लागला. गंभीर जखमी होऊन ते बेशुध्द पडले. कुटुंबीयांनी त्यांना सिडको महानगरातील वाळूज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अधिक उपचारासाठी ७ जुलैला सकाळी ओरीयन सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आयसीयूत उपचार चालू १३ जुलैला पहाटे पावणेपाचला त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
By City News Desk
Latest News
26 Jul 2025 12:29:38
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....