- Marathi News
- सिटी क्राईम
- प्रियकराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या, १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाख...
प्रियकराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या, १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, भावसिंगपुऱ्यातील धक्कादायक घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रेमप्रकरण घरी कळल्यानंतर तरुणीच्या पित्याने तीव्र विरोध करत प्रियकराला आमच्या मुलीसोबत यापुढे संपर्क ठेवू नको, असे बजावले. मात्र त्यानंतरही तो तरुणीला ब्लॅकमेल करत राहिला. त्यामुळे तरुणीने राहत्या घरात फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक भावसिंगपुऱ्यातील भीमनगरात समोर आली आहे. मुलीच्या आईने गुरुवारी (२४ जुलै) छावणी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या एक महिन्यापूर्वी प्रारंभीचे कुटुंबीय सचिनच्या घरी लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी गेले. मात्र सचिनला चांगले काम व नोकरी नव्हती. त्यामुळे प्रारंभीच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला. त्याचवेळी प्रारंभीच्या पालकांनी सचिनला आमच्या मुलीसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नको, असे सांगितले होते. मात्र सचिन हा प्रारंभीकडे, कधी तिच्या आईकडे पैसे मागत होता. त्याला प्रारंभीच्या आईने ३ हजार रुपये रोख दिलेही होते. १९ जुलैला सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रारंभी व तिची आई ब्युटी पार्लरला निघाल्या होतो. मात्र अचानक ती म्हणाली, की मला वॉशरूमला जायचे आहे, असे सांगून परत घरी आली. वॉशरूमवरून घरातील दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळेस ती फोनवर सचिनसोबत बोलत होती. काही वेळाने प्रारंभीने खोलीतील सिलींग फॅनला स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. तिला घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून रात्री साडेआठला मृत घोषित केले.
कुटुंबीयांनी प्रारंभीचा मोबाइल पाहिला असता सचिनचे स्नॅपचॅटवर खूप सारे मिसकॉल पडलेले होते. मेसेजमध्ये प्रारंभी ही सचिनला सांगत होती, की प्लीज सचिन, प्लीज ऐक ना.. प्लीज नको सांगू हे... मी परत काही नाही बोलणार, परेशान नाही करणार, लास्ट चान्स दे, फक्त प्लीज एवढं लास्ट वेळेस ऐक, वापस कधीच नाही काही बोलणार तुला मी... या मेसेजवरून प्रारंभीच्या कुटुंबीयांची खात्री झाली, की सचिन हा प्रारंभीला कोणत्या तरी कारणाने ब्लॅकमेल करून मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळूनच प्रारंभीने आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
By City News Desk
Latest News
26 Jul 2025 12:29:38
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....